Manmohan Singh Net Worth: डॉ.मनमोहन सिंग यांची संपत्ती इतक्या कोटींची! कर्ज,फ्लॅट, सोनं एकूण किती रुपयांची मालमत्ता

Last Updated:
News18
News18
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे सिंग यांची संपत्ती किती होती जाणून घेऊयात...
वृद्धापकाळाशी निगडीत आजारामुळे डॉ.सिंग यांना याआधी अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री घरीच त्यांची शुद्ध हरपली होती. त्यानंतर मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे एम्सने सांगितले.
इंडिया आघाडीतून काँग्रेसची हकालपट्टी करू; अरविंद केजरीवालांचा अल्टीमेटम
देशाचे पंतप्रंधान म्हणून सलग १० वर्ष सेवा करणारे सिंग यांनी २०१८ साली राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. या उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात डॉ. सिंग यांनी स्वत:ची एकूण संपत्ती १५.७७ कोटी इतकी असल्याचे सांगितले होते. या प्रतिज्ञापत्रानुसार २०१८-१९ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न हे ९० लाख इतके होते.
advertisement
राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताना सिंग यांनी स्वत:जवळ ३० हजार रुपये रोख रक्कम असल्याचे म्हटले होते. त्यांच्याकडे ३.८६ लाख रुपयांचे दागिने होते. डॉ.सिंग यांच्याकडे दिल्ली आणि चंदीगढ येथे एक फ्लॅट देखील आहे. जगातील अव्वल अर्थतज्ञांपैकी एक असलेल्या डॉ.सिंग यांच्यावर एकाही रुपयाचे कर्ज नव्हते.
view comments
मराठी बातम्या/देश/
Manmohan Singh Net Worth: डॉ.मनमोहन सिंग यांची संपत्ती इतक्या कोटींची! कर्ज,फ्लॅट, सोनं एकूण किती रुपयांची मालमत्ता
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement