अरविंद केजरीवालांचा काँग्रेसला अल्टीमेटम; २४ तास देतो निर्णय घ्या, नाही तर इंडिया आघाडीतून हकालपट्टी करू

Last Updated:
News18
News18
नवी दिल्ली: भाजपच्या विरोधातील इंडिया आघाडीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशावर सर्वाधिक सत्ता गाजवलेल्या काँग्रेस पक्षाला अल्टिमेटम दिला आहे.
जर काँग्रेसने २४ तासात अजय माकन यांच्यावर कारवाई केली नाही तर इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर करण्याची मागणी करणार असल्याचा धमकी वजा इशारा केजरीवाल यांनी दिला आहे.
मोदी सरकारचे मध्यमवर्गीयांना सर्वात मोठे गिफ्ट, अर्थसंकल्पात मिळणार गुड न्यूज
गेल्या काही दिवासांपासून इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करावे यावरून वाद सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर दाव करून काँग्रेसला धक्का दिला होता. त्याला अखिलेश यादव, शरद पवार,केजरीवाल, लालू यादव यांनी पाठिंबा देखील दिला होता. मात्र काँग्रेस यावर शांत होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपने थेट काँग्रेस विरोधात आघाडी उघडल्याने पक्षाला फार दिवस शांत राहता येणार नाही.
advertisement
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला सुनावले, मर्यादेत रहा
दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि आपने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हा वाद टोकाला तेव्हा गेला जेव्हा काँग्रेस नेत्याने केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. इतक नाही तर अजय माकन यांनी केजरीवाल यांना देशविरोधी म्हटले. संदीप दिक्षित यांना केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केल्यानंतर हे प्रकरण आणखी तापले. एका पाठोपाठ एक काँग्रेसकडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे आपचा संयम सुटला. पक्षाने थेट काँग्रेसविरुद्ध आघाडी उघडली.
advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्ला चढवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याचे त्यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. अजय माकन यांनी केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले आहे. काँग्रेसने आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर असे आरोप केले आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेत्याने केजरीवाल आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यांनी आजपर्यंत भाजपवर एफआयआर दाखल केला आहे का? काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपकडून केला जात असल्याची असल्याची माहिती मिळत आहे. संदीप दीक्षित, फरहाद सुरी यांना निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून निधी मिळत असल्याचे ऐकले आहे. काँग्रेसची भाजपशी संगनमत नसेल तर अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांवर २४ तासांत कारवाई करा. जर काँग्रेसने हे केले नाही तर आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करेल की यापुढे काँग्रेससोबत युती करता येणार नाही.
view comments
मराठी बातम्या/देश/
अरविंद केजरीवालांचा काँग्रेसला अल्टीमेटम; २४ तास देतो निर्णय घ्या, नाही तर इंडिया आघाडीतून हकालपट्टी करू
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement