100 कोटीचा सुपर हिट चित्रपट देणारा मराठी अभिनेता पालिकेच्या प्रचारात, काँग्रेस उमेदवारासाठी मागतोय मतं

Last Updated:

यंदाचा प्रचार फक्त राजकीय नेत्यांच्या भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यात आता बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचा ग्लॅमरस तडका लागला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता चक्क पडद्यावरचे लाडके कलाकार रस्त्यावर उतरले आहेत.

News18
News18
मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा पारा चढला असून निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक गल्लीत, चौकात फक्त आणि फक्त प्रचाराच्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. पण यंदाचा प्रचार फक्त राजकीय नेत्यांच्या भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यात आता बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचा ग्लॅमरस तडका लागला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता चक्क पडद्यावरचे लाडके कलाकार रस्त्यावर उतरले असून, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

वांद्र्याच्या अरुंद गल्ल्यांमध्ये रवीना टंडनची 'मशाल'

मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात काल एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. ९० च्या दशकातील 'धडकन' गर्ल रवीना टंडन चक्क शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारासाठी मैदानात उतरली. प्रभाग क्रमांक १०१ मधील उमेदवार अक्षता मिनेजेस यांच्यासाठी रवीनाने कंबर कसली. विशेष म्हणजे, रवीनाने केवळ गाडीतून हात दाखवून आपला प्रचार उरकला नाही, तर तिने या भागातील छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये पायी फिरून स्थानिकांशी संवाद साधला.
advertisement
हातात 'मशाल' चिन्हाचा पट्टा आणि चेहऱ्यावर आपुलकीचं हास्य घेऊन जेव्हा रवीना लोकांच्या दारात पोहोचली, तेव्हा तिला पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. "महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लढणाऱ्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे," असं म्हणत तिने ठाकरेंच्या उमेदवाराला आपला खुला पाठिंबा दर्शवला.
advertisement

लातूरमध्ये 'सैराट' फेम आकाश ठोसरची एन्ट्री

मुंबईत रवीनाची चर्चा असतानाच तिकडे लातूरमध्येही निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. मराठी चित्रपटातील हँडसम हंक आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला सैराट फेम आकाश ठोसर आपल्या आवडत्या उमेदवारासाठी थेट मैदानात उतरला आहे. लातूरमधील प्रभाग १ चे काँग्रेस उमेदवार गोपाळ बुरबुरे यांच्या प्रचारासाठी आकाशने हजेरी लावली होती.
advertisement
आपल्या लाडक्या 'परश्या'ला पाहण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती. आकाशने उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून पदयात्रेत सहभाग घेतला. त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. आता आकाश ठोसरच्या या स्टार पॉवरचा फायदा गोपाळ बुरबुरे यांना मतांच्या रूपात होणार का? हे पाहणं रंजक ठरेल.

सेलिब्रेटींच्या एन्ट्रीने निवडणुकीत रंगत

निवडणूक जवळ आली की कलाकार प्रचारात दिसणं नवीन नाही, पण यंदा ज्या पद्धतीने हे स्टार्स लोकांमध्ये मिसळून प्रचार करत आहेत, ते पाहता चुरस वाढली आहे. एकीकडे मुंबईत रवीना टंडन आणि दुसरीकडे लातूरमध्ये आकाश ठोसरची क्रेझ... या दोन्ही कलाकारांनी आपल्या पक्षासाठी आणि उमेदवारासाठी पूर्ण ताकद झोकून दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
100 कोटीचा सुपर हिट चित्रपट देणारा मराठी अभिनेता पालिकेच्या प्रचारात, काँग्रेस उमेदवारासाठी मागतोय मतं
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement