सूत्रांच्या माहितीनुसार यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेट भाषणात Part B वर विशेष भर दिला जाणार आहे. आतापर्यंत Part A मध्येच बहुतांश धोरणात्मक मुद्दे आणि माहिती दिली जात होती. तर Part B मुख्यतः करसंबंधी घोषणांपुरता मर्यादित असायचा. मात्र यंदा ही रचना बदलताना दिसू शकते.
Part B का ठरणार यंदाच्या बजेटचा कणा?
advertisement
सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, यावेळी Part B मध्ये केवळ तत्काळ निर्णयच नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणात्मक दिशा सविस्तरपणे मांडली जाणार आहे.
हा भाग पुढील काही वर्षांसाठी:
भारताची आर्थिक विचारधारा
प्राधान्यक्रम
दीर्घकालीन व्हिजन
यांचे स्पष्ट चित्र देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे भारताच्या देशांतर्गत क्षमतांना (domestic capabilities) जागतिक पातळीवर कसे सादर करायचे, याचा रोडमॅपही Part B मध्ये समोर येण्याची शक्यता आहे.
देशापुरते मर्यादित नाही, जागतिक लक्ष Part B कडे
याच कारणामुळे यंदाच्या बजेटमधील Part B केवळ भारतीय गुंतवणूकदारांसाठीच नव्हे, तर जगभरातील अर्थशास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि जागतिक संस्थांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. या भागातून केवळ पुढील आर्थिक वर्ष नव्हे, तर भारत पुढील दशकात कोणत्या दिशेने जाणार आहे, याची झलक मिळू शकते.
बजेटचे Part A आणि Part B म्हणजे काय?
साधारणपणे केंद्रीय बजेट दोन भागांत सादर केले जाते.
Part A मध्ये:
अर्थव्यवस्थेची दिशा
विकासाची रणनीती
कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य
ग्रामीण विकास, MSME
विविध योजनांचे खर्च व आवंटन
यांचा समावेश असतो.
Part B मध्ये:
इनकम टॅक्स
कस्टम आणि ट्रेड टॅरिफ
Make in India
देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन
निर्यात वाढीसाठी करसवलती
यांसारख्या करसंबंधी घोषणांवर भर असतो.
मागील बजेटमध्ये काय होते?
2025-26 च्या बजेटकडे पाहिले, तर...
Part A मध्ये कृषी, MSME, गुंतवणूक, निर्यात, फायनान्शियल सेक्टर सुधारणा आणि फिस्कल कन्सॉलिडेशनवर भर होता.
Part B मध्ये आयकर सवलती, TDS/TCS मधील बदल, रिटर्न भरण्यात सुलभता आणि बेसिक कस्टम ड्यूटीत सूट यासंबंधी घोषणा करण्यात आल्या होत्या.
यंदा मात्र Part B चा आवाका अधिक व्यापक आणि धोरणात्मक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
