जर तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल, तर पोस्ट ऑफिस RD (रेकरींग डिपॉझिट) आणि म्युच्युअल फंडातील SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो, त्यांचा नफा आणि फ्लेक्जिबलिटी वेगवेगळी आहे. तुम्हाला जास्त फायद्याचा पर्याय कोणता ठरतो त्यावर तुम्ही कुठे गुंतवणूक करायची ते ठरवायचं आहे.
advertisement
पोस्ट ऑफिस RD: सुरक्षित आणि स्टेबल रिटर्न्स
पोस्ट ऑफिस RD पाच वर्षांसाठी असते आणि गॅरंटीड व्याज दर (सध्या 6.5%) मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 5000 रुपये गुंतवले, तर पाच वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 3,00,000 रुपये मिळतील. यावर 54,957 रुपये व्याज मिळून मॅच्युरिटीवेळी एकूण 3,54,957 रुपये रक्कम मिळेल. RD च्या काही मर्यादा आहेत, जसे की ठरलेली रक्कम पाच वर्षांपर्यंत दरमहा गुंतवावी लागते आणि मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी मर्यादित आहे.
5 लाखांचे 15 लाख करण्याची सुवर्णसंधी! ही आहे पोस्ट ऑफिसची भारी स्किम
SIP: जास्त परतावा आणि फ्लेक्जिबलिटी
SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा एक प्रकार आहे जो मार्केटशी जोडलेला असतो. यामध्ये साधारणतः 12% वार्षिक परतावा मिळतो. जर तुम्ही दरमहा 5000 रुपये SIP मध्ये गुंतवले, तर पाच वर्षांत 3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,12,432 रुपये व्याज मिळून एकूण 4,12,432 रुपये रक्कम मिळेल. SIP मध्ये मोठी रिस्क आणि फ्लेक्जिबलही आहे. तुम्ही SIP मध्येच थांबवू देखील शकता, होल्ड करू शकता किंवा मॅच्युरिटीपूर्वीही पैसे काढू शकता. जर एक वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढले तर दंड बसतो मात्र त्यापेक्षा जास्त कालवधी असेल आणि पैसे काढले तर दंड लागत नाही.
कोणता पर्याय निवडावा?
- सुरक्षितता प्राधान्य असेल तर: RD योग्य आहे, कारण येथे तुमचे पैसे गॅरंटीड आहेत.
- जास्त परताव्याचा विचार असेल तर: SIP हा चांगला पर्याय आहे, कारण मार्केटमधील वाढीचा तुम्हाला फायदा होतो.
5 वर्ष 500-1000 सह 1500-2000 ची SIP केल्यावर किती पैसे मिळतील, समजून घ्या गणित
तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक निवडा. पोस्ट ऑफिस RD स्थिर आणि सुरक्षित आहे, तर SIP तुम्हाला जास्त परतावा आणि लवचिकता देते. योग्य निवड करून तुमच्या आर्थिक भविष्याला बळकट करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यवस्थित प्लॅन करुन दोन्हीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि फ्लेक्जिबल दोन्हीचा फायदा मिळेल.
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही फायद्या-तोट्यासाठी न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)