चहा-बिस्किटातून सुचली व्यवसायाची कल्पना
गौरव आणि मानसी यांनी एकत्रच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी घेत असतानाच दोघांनीही नोकरी न करता व्यवसायात उतरायचे ठरवले होते. मात्र, नक्की कोणता व्यवसाय करायचा? या प्रश्नाचे उत्तर त्यांना एका सकाळी न्याहारी करताना मिळाले.
ही दोस्ती तुटायची नाय..! मुंबईतली मराठी शाळा अन् 1985 ती बॅच, 'यारी' पाहून वाटेल हेवा, Video
advertisement
चहा घेताना बिस्किटाच्या पुड्यावरील मजकूर वाचत असताना गौरव यांच्या लक्षात आले की, बाजारातील बिस्किटांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो. हे आरोग्यासाठी घातक असल्याचे ओळखून त्यांनी आरोग्यदायी बिस्किटे तयार करण्याचा निर्णय घेतला. पाककला आणि तांत्रिक अभ्यासाची सांगड मानसी यांना पाककलेची आवड होती, तर गौरव यांच्याकडे व्यावसायिक दृष्टी होती. दोघांनी मिळून या विषयावर सखोल अभ्यास केला.
आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी पौष्टिक कडधान्यांपासून कुकीज तयार करण्याचे प्रयोग सुरू केले. सुरुवातीला घरातूनच हा छोटासा प्रयत्न सुरू झाला. विशेष म्हणजे, प्रत्येक उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी ते स्वतः त्याची चव आणि दर्जा तपासून पाहत असत.
कुकीज बाईट ब्रँडची भरारी सुरुवातीला नाशिकपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय पाहता पाहता विस्तारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेट (भरड धान्य) वर्षाच्या निमित्ताने केलेल्या आवाहनामुळे त्यांच्या उत्पादनांना अधिक मागणी वाढली. आज जाधव दाम्पत्य ज्वारी, बाजरी, नाचणी/नागली, मका या धान्यांपासून कुकीज बनवत आहेत.
सुरुवातीला एका प्रकारच्या बिस्किटापासून सुरू झालेला हा प्रवास आज 6 ते 7 प्रकारच्या कुकीजपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी कुकीज बाईट नावाने स्वतःची कंपनी स्थापन केली असून, याद्वारे ते आता स्थानिक नागरिकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत. आपण जे खातोय ते शुद्ध असावे या ध्येयातून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. आज लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत, त्यामुळे आमच्या मिलेट कुकीजला मोठी पसंती मिळत आहे, असे गौरव यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.