वर्ष २०२५ मध्ये सोन्याने एकूण ४५ वेळा उच्चांकी दर गाठले. मागील काही दशकांमध्ये सोन्याच्या दराने टाकलेलं सर्वात मजबूत पाऊल आहे. मात्र, 'सिटी'चे कमोडिटीज रिसर्चचे जागतिक प्रमुख मॅक्स लेटन यांनी आता सोन्याच्या दरवाढीचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी सांगितले की संस्थात्मक खरेदी, भू-राजकीय तणाव आणि डॉलर निर्देशांकात ८ टक्क्यांची घसरण यामुळे सोन्याचे भाव वाढले. मात्र, आता हेच प्रमुख आधार घटक आता कमकुवत होत आहेत.
advertisement
सोन्याच्या दरावरील आतापर्यंतचा मोठा अंदाज...
'सिटी'ने सोन्याच्या दराबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. सिटीने आपल्या सोन्याच्या किमतीच्या अंदाजात म्हटले आहे की २०२६ च्या अखेरीस सोने प्रति औंस ३,६०० डॉलर ते ३,८०० डॉलरपर्यंत पोहोचण्याची ५० टक्केच शक्यता आहे. अहवालानुसार, २०२६ मध्ये सोने ५,००० डॉलर आणि २०२७ मध्ये ६,००० डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचण्याची फक्त ३० टक्केच शक्यता आहे.
सोन्यापेक्षा चांदीच भाव खाणार!
'सिटी'च्या मते, पुढील सहा महिन्यांत सोन्यापेक्षा चांदीला अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. चांदीच्या किमती प्रति औंस ६२ डॉलर ते ७० डॉलर दरम्यान पोहोचण्याची अपेक्षा आहे. अहवालात असे म्हटले आहे की यूएस कलम २३२ च्या संभाव्य अंमलबजावणीमुळे पीजीएम धातूंवर परिणाम होत आहे. सिटीचा अंदाज आहे की यूएस प्लॅटिनमच्या किमती ५० टक्क्यांनी वाढू शकतात.
सोन्याचा दर घसरणार?
लेटन म्हणाले की अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून टॅरीफवरील पुनर्रचना जवळपास आता पूर्ण झाली आहे. त्याशिवाय, अमेरिकेची वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे आता सोन्याच्या किमतीत होणारी वाढ थांबू शकते. याच्या परिणामीच, 'सिटी'ने पुढील ६ ते १२ महिन्यांसाठी सोन्यावरील आपला अंदाज हा तटस्थतेकडून मंदीच्या शक्यतेकडे वळवला आहे.
चांदी आधीच ५० डॉलर प्रति औंसच्या पुढे गेली आहे आणि सिटीला पाच वर्षांच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे आणि मजबूत औद्योगिक मागणीमुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिटीच्या मते, चांदी ६२ डॉलरपर्यंत पोहोचू शकते आणि तेजीच्या परिस्थितीत, ७० डॉलरपर्यंत देखील पोहोचू शकते. गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी चांदी, तांबे आणि अॅल्यूमिनियम सारख्या धातूंकडे वळत आहेत.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. हा कोणताही गुंतवणूक विषयक सल्ला नाही. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
