TRENDING:

Gold Price : ज्याची भीती तेच घडलं, चीनमुळे जळगावातल्या सोन्यावर परिणाम, मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

Last Updated:

Gold Price News : जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. सोन्याचा दर आता प्रति 10 ग्रॅम दर हे एक लाख रुपयाच्या उंबरठ्यावर आले आहेत.

advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारतातही होत असतो. चीनमध्ये घडणाऱ्या घडामोडीचा परिणाम महाराष्ट्रातील जळगावातील सराफा बाजारावर झाला आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. सोन्याचा दर आता प्रति 10 ग्रॅम दर हे एक लाख रुपयाच्या उंबरठ्यावर आले आहेत.
News18
News18
advertisement

जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याने तब्बल 99,400 रुपये (जीएसटीसह) या उच्चांकी पातळीवर मजल मारली आहे. येत्या काही दिवसांत हे दर एक लाखांचा टप्पा सहज पार करतील, असा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेत दिसून येत आहे. चीनने गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत केवळ पंधरा दिवसांत भरघोस प्रमाणात सोने खरेदी केले आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या स्थितीचा थेट परिणाम भारतातील, विशेषतः जळगावसारख्या सुवर्ण नगरीतील दरांवर झाला आहे.

advertisement

सोन्यातील ही सततची वाढ पाहता गुंतवणूकदारही गोंधळले आहेत. काहींनी अजून खरेदी करण्याचा विचार करत असले, तरी ग्राहकांनी मात्र प्रतीक्षा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला 24 कॅरेट सोन्याचा दर 96,300 रुपये असून, जीएसटीसह तो 99,400 रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या दरवाढीचा हा कल कायम राहिल्यास 'लाखाचा सोन्याचा तोळा' ही म्हण प्रत्यक्षात उतरू शकेल. दरम्यान सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

सोन्याच्या दराचा चढता आलेख...

1926 रोजी सोन्याचे दर 18.43 रुपये होते. साधारण 1940 पर्यंत हे दर वाढून 36.04 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर हे दर वाढून 1950 पर्यंत 99 रुपये हे सोनं होतं. 1980 मध्ये साधारण हा दर वाढून 1330 वर पोहोचला होता. 2000 रोजी सोन्याचे दर ४४०० रुपये सोन्याचे दर पोहोचले होते. २०१० मध्ये सोनं १८५०० रुपये सोन्यासाठी पैसे मोजावे लागत होते. आता मात्र यामध्ये तीनपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2019 मध्ये सोनं 40 हजार होतं, आता हेच दर 4 जानेवारी 2023 रोजी 55 हजारवर पोहोचले होते.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Price : ज्याची भीती तेच घडलं, चीनमुळे जळगावातल्या सोन्यावर परिणाम, मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल