आज, बुधवार, ३ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. दुसरीकडे, चांदीचा भाव जीएसटीशिवाय १,७८,६८४ रुपये प्रति किलोवर खुला झाला. आणि जीएसटीसह १,८४,०४४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. हा त्याचा सर्वकालीन उच्चांक आहे. मंगळवारी, चांदी जीएसटीशिवाय १,७४,६५० रुपये प्रति किलोवर आणि जीएसटीशिवाय सोने १,२७,५९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. आज व्यवहार सुरू झाले तेव्हा चांदी ४,०३४ रुपयांनी महाग झाली.
advertisement
२२ कॅरेट सोने जीएसटीसह १,२१,२८४ रुपये आणि १८ कॅरेट सोने ९९,३०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९५७ रुपयांनी वाढ झाली. जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १,२८,५५० रुपये इतका दर झाला आहे. तर, जीएसटीसह त्याची किंमत आता प्रति १० ग्रॅम १,३२,४०६ रुपये आहे.
१७ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दराने १,३०,८७४ हा त्याचा ऑल टाइम हाय रेट गाठला होता. त्या तुलनेत आता सोनं फक्त २३२४ रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या दराने आपला रेकोर्ड ब्रेक दर गाठला आहे. चांदीच्या दराचा नवा उच्चांक हा १,७८, ६८४ रुपये इतका आहे.
>> कॅरेटनुसार सोन्याचे दर
आज, २३ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२८,०३५ रुपयांवर खुला झाला. आज ९५३ रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली. जीएसटीसह त्याची किंमत आता १,३१,८७६ आहे, मेकिंग चार्जेसचा यात समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ८७७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,१७,७५२ झाली आहे. जीएसटीसह, १,२१,२८४ रुपये इतकी झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव ७१८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९६,४१३ रुपये झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,३०५ रुपये झाली.
१४ कॅरेट सोन्याचा भावही ५६० रुपयांनी वाढला आहे. आज ७४,६४२ रुपयांवर उघडला आणि आता जीएसटीसह ७७,४५८ रुपयांवर पोहोचला आहे.
या वर्षी सोने प्रति १० ग्रॅम ५२,८१० रुपयांनी महाग झाले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रति किलो ९२,६६७ रुपयांनी वाढ झाली आहे.
इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जाहीर करतात. त्याशिवाय, प्रत्येक शहरानुसार, सोनं-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
