शनिवारी 49व्या सिव्हिल अकाउंट्स डे निमित्त पनगडिया म्हणाले की, पंतप्रधानांचा विकसित भारताचा स्वप्नसाकार करणे शक्य आहे. तंत्रज्ञान, भांडवली गुंतवणूक आणि कौशल्य विकासाच्या मदतीने देश वेगाने प्रगती करू शकतो. कमी उत्पन्नामुळे भारताकडे प्रगतीसाठी मोठी संधी आहे.
Cheapest Gold: या पाच ठिकाणाहून सोने खरेदी करा, थेट ८ ते १५ हजार रुपये वाचतील
advertisement
पनगडिया हे कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. भारतात अनेक आर्थिक सुधारणा केल्या गेल्या असून भविष्यातही सुधारणा सुरू राहतील. जागतिक बँकेच्या निकषानुसार विकसित देशांसाठी 14,000 डॉलर प्रति व्यक्ति उत्पन्नाची मर्यादा निश्चित केली आहे.
अत्यंत दुर्मीळ Stock, गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले, 1 लाखाचे झाले 7.87 कोटी
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या दरवर्षी 0.6% दराने वाढेल. त्यामुळे, विकसित देशांच्या श्रेणीत पोहोचण्यासाठी भारताच्या GDP मध्ये दरवर्षी 7.9% वाढ आवश्यक आहे. गेल्या 21 वर्षांत भारताची सरासरी विकासदर 7.8% राहिली आहे, त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.