शेअर मार्केटमधील अत्यंत दुर्मीळ Stock, गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले, 1 लाखाचे झाले 7.87 कोटी

Last Updated:

Multibagger Stocks: हिताची एनर्जी इंडिया या शेअरने अवघ्या 5 वर्षांत 78,566% परतावा दिला आहे. फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक 7.87 कोटींवर पोहोचली!

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना कोट्याधीश केले आहे. असे शेअर्समध्ये सोन्याची खाण होय. मात्र हे शेअर्स शोधणे सोपे नसते. हिताची एनर्जी इंडिया (Hitachi Energy India) हा असाच एक शेअर आहे. पाच वर्षांत तब्बल 78,566% परतावा देत गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे.
15 रुपयांवरून 11,800 रुपयांपर्यंत प्रवास!
1949 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी पॉवर टेक्नोलॉजी आणि एनर्जी सोल्युशन्स क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे. पूर्वी हिला ABB Power Products and Systems India Limited म्हणून ओळखले जायचे. पाच वर्षांपूर्वी 15 रुपये असलेला हा शेअर आज 11,800 रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
1 लाखाचे 7.87 कोटी झाले असते!
जर पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य थेट 7.87 कोटी रुपयांवर पोहोचले असते. हा वाढीचा दर 787 पट आहे. जो शेअर बाजारात अत्यंत दुर्मीळ मानला जातो.
advertisement
कंपनीचा दमदार कामगिरी
रेव्हेन्यू: चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1,620.27 कोटींवर पोहोचला, जो मागील तिमाहीत 1,553.74 कोटी होता.
नफा: डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 137.38 कोटी होता, जो मागील तिमाहीत फक्त 52.29 कोटी होता.
गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
इतक्या झपाट्याने वाढ झाल्यानंतर हा शेअर आणखी वर जाईल की घसरेल? याकडे बाजार विश्लेषकांचे लक्ष आहे. अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
advertisement
बँकेची Galti Se Mistake; अकाउंटमध्ये चुकून जमा केले 70 लाख कोटी, चूक लक्षात आली
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती स्टॉकच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे असल्याने, गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही नुकसानासाठी News18 मराठी जबाबदार राहणार नाही.) 
मराठी बातम्या/मनी/
शेअर मार्केटमधील अत्यंत दुर्मीळ Stock, गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले, 1 लाखाचे झाले 7.87 कोटी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement