तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये तुमचा फोन नंबर अपडेट करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI पोर्टल Ask.uidai.gov.in वर जावे लागेल. आता तुम्हाला तो फोन नंबर टाकावा लागेल जो तुम्हाला अपडेट करायचा आहे.
तुमचा जुना मोबाईल नंबर सेवेत नसल्यास, आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. अनेक वेळा असे घडते की लोकांचे मोबाईल हरवतात किंवा काही कारणास्तव नंबर निष्क्रिय होतात. जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल, तर तुम्ही तो यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या डेटाबेसमध्ये अपडेट करू शकता. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बदलू शकता. चला, जाणून घेऊया या प्रोसेसबद्दल.
advertisement
Investment Tips: कमी गुंतवणूक आणि जास्त रिटर्नसाठी हवेय ना? मग 'हे' पर्याय ठरतील फायदेशीर
या स्टेप्स फॉलो करा
>> जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
>> आधार अपडेट/सुधारणा फॉर्म भरा.
>> आधार एक्जिक्युटिव्हकडे फॉर्म सबमिट करा.
>> तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल
>> तुम्हाला एक पावती दिली जाईल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. अपडेट विनंतीची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
>> तुमचा मोबाईल नंबर 90 दिवसांच्या आत आधारच्या डेटाबेसमध्ये अपडेट केला जाईल.
