Car Loan घ्यायचंय? मग ही कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवीत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कार लोन घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात? ऑनलाईन कसे जमा करायचे वाचा सविस्तर
मुंबई : नव्या वर्षात किंवा या डिसेंबरमध्ये जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांनी कमी व्याजदरात लोन दिलं जात आहे. हळूहळू लोक इलेक्ट्रिक कारकडे वळत आहे. त्यामुळे बँकांनी देखील आता यासाठी लोन द्यायला सुरुवात केली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही ऑफलाईन देखील अर्ज करू शकता. पण लोनची प्रक्रिया करण्याआधी कोणती कागदपत्र लागतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. यातलं एकजरी कागदपत्र द्यायचं राहिलं तरी तुमची लोनची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आताच या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला घ्या.
advertisement
कोणती कागदपत्र लागतात
-दोन पासपोर्ट साइज फोटो
-ओळखीचा पुरावा - निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक ओरिजनल आणि ट्रू कॉपी दोन्ही
-रहिवासी पुरावा - वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल (लँडलाइन), आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतंही एक ओरिजनल आणि ट्रू कॉपी दोन्ही
advertisement
नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कोणती कागदपत्र लागतात
-मागील ३ महिन्यांच्या वेतन स्लिपची मूळ/प्रमाणित प्रत
-प्राप्तिकर विभागाची रीतसर पोचपावती असलेल्या मागील २ वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याची प्रत / प्राप्तिकर मूल्यांकन आदेश किंवा नियोक्त्याकडून जारी झालेला मागील २ वर्षांसाठी फॉर्म १६.
advertisement
-जिथे शक्य असेल तिथे नियोक्त्याकडून महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवण्याची हमी
-इतर बँकेमध्ये पगार जमा होत असल्यास त्या खात्याचे मागील ६ महिन्यांचे स्टेटमेंट
व्यावसायिक/उद्योजकांसाठी वर्गासाठी
-नफा आणि तोटा खाते, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट इत्यादि सह प्राप्तिकर विभागाची रीतसर पोचपावती असलेल्या मागील ३ वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याची प्रत (व्यावसायिकांच्या बाबतीत २ वर्षे)
advertisement
-दुकान आस्थापना कायदा अंतर्गत परवाना
-कर नोंदणी प्रत
-कंपनी नोंदणी परवाना
-मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट
इतर उत्पादनांवर मिळणारं कर्ज
view commentsजुन्या वाहनासाठी कर्ज, बाईकसाठी कर्ज, महा कॉम्बो योजना, वैयक्तीक कर्ज अशा विविध योजनांचा लाभ बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऑनलाईन साईटवरून घेता येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 10:08 AM IST











