Gold : अशा पद्धतीने तुम्ही सोनं वापरत असाल तर होऊ शकतं तुमचं नुकसान

Last Updated:

सोनं ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण करते आणि ते वाईट परिणाम शरीरातून काढून टाकते. सर्दी किंवा श्वसनाचे आजार असल्यास करंगळीत सोने धारण करावे.

News18
News18
मुंबई : प्रत्येक स्त्रीचा जीव साडी आणि सोन्यात गुंतलेला असतो. बऱ्याचदा सोनं खरेदी करताना महिलांना फसवणुकीला सामोरं जावं लागलं किंवा लुबाडलं जातं. अशा घटना टाळण्यासाठी तुम्हाला हे नियम नेहमी माहिती असणं गरजेचं आहे.
मेष, कर्क, सिंह आणि धनु असेल तर तुमच्यासाठी सोने परिधान करणे चांगले राहील. वृश्चिक आणि मीन राशीसाठी मध्यम आणि वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ राशीसाठी चांगले नाही. तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी कमीत कमी सोने परिधान करावे.
जे लोक लोखंड, कोळसा किंवा शनिशी संबंधित कोणत्याही धातूचा व्यवसाय करत असतील तर त्यांनी सोने घालू नये. असे केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. गरोदर महिला आणि वृद्ध महिलांनीही सोने घालू नये असं जाणकार मंडळी सांगतात.
advertisement
सोनं ऊर्जा आणि उष्णता दोन्ही निर्माण करते आणि ते वाईट परिणाम शरीरातून काढून टाकते. सर्दी किंवा श्वसनाचे आजार असल्यास करंगळीत सोने धारण करावे. जर तुम्हाला आदर आणि सहकार्य हवे असेल तर सोने परिधान करा. जर तुम्हाला एकाग्रता हवी असेल तर तर्जनीमध्ये सोने घाला. वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर गळ्यात सोन्याची साखळी घाला. मूल नसेल तर अनामिकेत सोन्याची अंगठी घाला.
advertisement
सोने डाव्या हातात घालू नये. जेव्हा विशेष गरज असेल तेव्हाच ते डाव्या हातावर घाला. डाव्या हातात सोने धारण केल्याने त्रास होऊ शकतो. सोन्याच्या जोडव्या किंवा कमरेत सोनं घालू नये कारण सोन्य अत्यंत पवित्र धातू आहे. हा बृहस्पतिचा धातू आहे. माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पायात घालू नये असं म्हटलं जातं.
advertisement
जर तुम्ही सोनं परिधान करत असाल तर मद्य आणि मांसाहार करू नका. असे केल्याने तुम्हाला समस्यांनी घेरले जाऊ शकते. सोने हा गुरूचा पवित्र धातू आहे आणि त्याची शुद्धता राखणे आवश्यक आहे. झोपताना उशीवर सोने ठेवू नका. बरेच लोक आपली अंगठी किंवा साखळी काढून उशीखाली ठेवतात. यामुळे झोपेची समस्या तर निर्माण होईलच, पण इतर समस्याही उद्भवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gold : अशा पद्धतीने तुम्ही सोनं वापरत असाल तर होऊ शकतं तुमचं नुकसान
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement