जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करत असेल तर तुम्ही ते लॉक करू शकता. UIDAI यूझर्सला त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फीचर्स ऑफर करते. यापैकी एक म्हणजे आधार लॉक करणे. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे लॉक करू शकता हे आपण आज पाहणार आहोत.
advertisement
आधार कार्ड बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे?
आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhaar सेक्शनमध्ये लॉक आधारचा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमचे आधार सहज लॉक करू शकता.
आधार लॉक करने का तरीका?
आधार लॉक करने से पहले आपको 16 डिजिट की वर्चुअल ID क्रिएट करनी होगी. क्योंकि VID की मदद से ही आप आधार को लॉक या अनलॉक कर सकते हैं.
EPFO : दिवाळी बोनस मिळत नाहीये? मग पीएफ अकाउंटमधून काढता येतील पैसे, पण...
आधार लॉक करण्याची प्रोसेस
-आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/en/ वर जावे लागेल.
-येथे तुम्हाला My Aadhaar च्या ऑप्शनवर जावे लागेल, तेथे अनेक ऑप्शन उपलब्ध असतील. यामध्ये तुम्हाला Lock/unlock या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
-VID जनरेट केल्यानंतर, आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा एंटर करावा लागेल. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल.
-तुम्ही OTP टाकून तुमचा आधार लॉक करू शकता. बायोमेट्रिक्स अनलॉक करण्यासाठी, तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
-तुम्हाला फक्त आधार लॉक ऐवजी आधार अनलॉकचा ऑप्शन निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा VID आणि कॅप्चा टाकून OTP जनरेट करावा लागेल आणि त्यानंतर पुढील प्रॉसेस फॉलो करावी लागेल.
'या' लोकांना मोदी सरकार विना गॅरंटी देतंय 3 लाख रुपये, लगेच चेक करा तुम्हाला मिळतील का?
याचा फायदा काय?
लक्षात ठेवा की आधार बायोमेट्रिक्स लॉक फीचर चालू केल्यानंतर, कोणीही तुमचे बायोमेट्रिक्स वापरू शकणार नाही. युजर्सच्या सुरक्षिततेसाठी हे फिचर जोडण्यात आले आहे. आधार लॉक फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार नंबरच्या जागी VID शेअर करता. यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील.
