'या' लोकांना मोदी सरकार विना गॅरंटी देतंय 3 लाख रुपये, लगेच चेक करा तुम्हाला मिळतील का?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
PM Vishwakarma Yojna मध्ये मोदी सरकार विना गॅरंटी 3 लाख रुपयांचं लोन देत आहे. या योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकतं चला पाहूया.
मुंबई : तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि सरकारकडून आर्थिक मदत घ्यायची असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्किम तुमच्या फायद्याची आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने पीएम विश्वकर्मा योजना स्किम सुरु केली. ही स्किम तुमच्या खूप कामी येऊ शकते. या स्किम अंतर्गत सरकार 3 लाखांपर्यंतचं लोन विना गॅरंटी देते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यापासूनच ठरलेल्या 18 ट्रेड्टसशी संबंधीत असायला हवा.
आर्थिक मदतीसह स्किल ट्रेनिंग
पीएम विश्वकर्मा योजना ही प्रत्यक्षात केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. ज्यामध्ये गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती. यामध्ये विविध व्यवसायांशी निगडित लोकांना केवळ हमीशिवाय कर्ज दिले जात नाही. तर त्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर स्टायपेंडसह अन्य लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
advertisement
दोन टप्प्यात दिली जाते कर्जाची रक्कम
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सर्वात मोठा फायदा हा असेल की जर कोणत्याही कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक समस्यांमुळे अडचणी येत असतील तर तो या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो. यामध्ये तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात, व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात, लाभार्थी त्याच्या विस्तारासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज अत्यंत सवलतीच्या 5 टक्के व्याजदराने दिले जाईल.
advertisement
ट्रेनिंगसह दररोज 500 रुपये स्टायपेंड
या योजनेत एकीकडे व्यवसाय उभारण्यासाठी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. तर दुसरीकडे याअंतर्गत ठरलेल्या 18 ट्रेडमधील लोकांचे कौशल्य आणखी वाढवण्यासाठी सुमारे एक आठवड्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. हे ट्रेनिंग मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून दिले जाते आणि त्याशिवाय प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल. लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, बेसिक आणि अडव्हान्स ट्रेनिंगशी संबंधित स्किल अपग्रेडेशन, 15,000 रुपयांचे टूलकिट इन्सेंटिव्ह, डिजिटल ट्रांझेक्शनसाठी इन्सेंटिव्ह दिले जाईल.
advertisement
ही 18 कामं करणाऱ्यांना मिळेल कर्ज
या योजनेचा लाभ कौशल्याची कामं करणाऱ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये सुतार, बोट बांधणारे, लोहार, कुलूप बनवणारे, सोनार, भांडी बनवणारा (कुंभार), शिल्पकार, राज मिस्त्री, मास्याचं जाळं बनवणारे, टूल किट निर्माता, दगड तोडणारे, चांभार, टोपली/चटई/झाडू निर्माते, बाहुली आणि इतर खेळणी उत्पादक (पारंपारिक), नाई, हार बनवणारे, धोबी, शिंपी अशा कारागिरांचा समावेश आहे.
advertisement
आणखी पात्रता काय हवी?
अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. लाभार्थी विश्वकर्माने ठरवलेल्या 18 व्यापारांपैकी एक व्यवसाय करणारा असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे. अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक आहेत
advertisement
ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचं सर्टिफिकेट, ओळखपत्र, निवासी प्रमाण पत्र, पासपोर्ट साइज फोटो, बँकेचं पासबुक, व्हॅलिड मोबाईल नंबर
असा करा अर्ज
-अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जा.
-होमपेजवर PM Vishwakarma Kaushal Samman Yojana दिसेल.
advertisement
-येथे उपस्थित असलेल्या Apply Online ऑप्शन लिंकवर क्लिक करा.
-आता येथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल.
-रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे पाठवला जाईल.
-यानंतर, रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा.
-भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
-आता फॉर्ममध्ये टाकलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 30, 2023 3:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
'या' लोकांना मोदी सरकार विना गॅरंटी देतंय 3 लाख रुपये, लगेच चेक करा तुम्हाला मिळतील का?









