TRENDING:

या वर्षी काही खरं नाही! बजेटच्या आधी अर्थव्यवस्थेला झटका; GDPने दिले मंदीचे संकेत, ४ वर्षातील निच्चांकी अंदाज

Last Updated:

India GDP: चालू आर्थिक वर्षात GDPचा दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 8.2 टक्के दराने वाढली होती.

advertisement
नवी दिल्ली: आर्थिक आघाडीवर पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात विकास दर 8.2 टक्के नोंदवला होता. मंगळवारी सरकारकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या जीडीपीचा पहिला अंदाज जाहीर केला.
News18
News18
advertisement

गेल्या वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये आर्थिक विकासाचा दर 8.2 टक्के इतका होता. तर चालू आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने जीडीपी 6.6 इतका असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र NSOचा अंदाज यापेक्षा कमी आहे.

HDFC कडून तुम्ही कर्ज घेतले आहे का? बँकेने नव्या वर्षात दिली गुड न्यूज

advertisement

आर्थिक विकास दराचा हा अंदाज आगामी अर्थसंकल्प तयार करताना महत्त्वाची भूमिका बजावतो. हा अंदाज आर्थिक आघाडीवर मंदीचे संकेत देत आहे. चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत विकास दरात मोठी घसरण झाली होती. दुसऱ्या तिमाहीत विकास दर 5.4 टक्क्यांवर घसरला होता. आयबीआयने 2024साठीचा सुधारित विकास दर 6.6 इतका असेल असे म्हटले आहे. त्याआधी हा दर 7.2 टक्के इतका वर्तवण्यात आला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
या वर्षी काही खरं नाही! बजेटच्या आधी अर्थव्यवस्थेला झटका; GDPने दिले मंदीचे संकेत, ४ वर्षातील निच्चांकी अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल