हरदीप पुरी यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेकडून होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की- भारताने कच्च्या तेलाच्या आयातीचे स्रोत 27 वरून 40 केले आहेत. म्हणजे पूर्वी भारत ज्या 27 देशांकडून कच्चं तेल आयात करत होता. आता ती संख्या 40 वर गेली आहे. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी बुधवारी सांगितले होते की- भारत,चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांवर निर्बंध लावले जाऊ शकतात कारण हे देश सातत्याने रशियासोबत व्यापार करत आहेत.
advertisement
टाटांचा मोठा निर्णय, 500 कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता; नोकर कपात करताना...
भारताने रशियाकडून कोणताही "प्रतिबंधित" तेल खरेदी केलेले नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, रशियाच्या तेलावर जागतिक पातळीवर कोणताही बंदी नव्हती. केवळ त्याच्या किंमती एक ठराविक मर्यादेत ठेवण्यात आल्या होत्या. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला काळजी वाटत नाही. काही घडलं तरी आपण त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवतो. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात पुरवठा उपलब्ध आहे,असे पुरी यांनी स्पष्ट केलं.
शेअर बाजार बंद होताच आली मोठी बातमी; उद्या Market ओपन होताच Money Rain होणार!
खिशावर किती खर्च?
‘दैनिक भास्कर’ने रेटिंग एजन्सीजच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलवर तेल कंपन्यांना प्रति लिटर 12 ते 15 पर्यंत आणि डिझेलवर सुमारे 6 नफा होत आहे. तरीदेखील गेल्या एका वर्षात एकदाही त्यांनी दर कमी केलेले नाहीत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता असताना सरकारने उलट 2 प्रति लिटर एक्साइज ड्युटी वाढवली. त्यामुळे कंपन्यांना दर कमी करण्यापासून सूट मिळाली.
मुलांच्या फ्युचर प्लॅनवर धोकादायक इशारा, 69 लाख अन् 1.4 कोटींचं सत्य ऐकून हादराल
सरकारही या नफ्यात मागे नाहीत. केवळ दिल्लीबद्दल सांगायचं झाल्यास केंद्र सरकार पेट्रोलवर 21.90 आणि राज्य सरकार 15.40 कर (टॅक्स) आकारते – एकूण 37.30 प्रति लिटर. डिझेलवर हे कर 30.63 प्रति लिटरपर्यंत पोहोचतात. एक सरासरी शहरी नागरिक महिन्याला सुमारे 2.80 लिटर पेट्रोल आणि 6.32 लिटर डिझेल वापरतो. या हिशोबाने फक्त टॅक्सच्या स्वरूपात त्याच्या खिशातून दर महिन्याला सुमारे 298 खर्च होतात.