टाटांचा मोठा निर्णय, 500 कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता; नोकर कपात करताना घेतली ही काळजी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tata Motors: ब्रिटनमध्ये टाटांच्या मालकीची जग्वार लँड रोव्हर कंपनी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरी जात आहे. व्यवस्थापकीय पदांवर गदा येत असून, सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.
लंडन : टाटा मोटर्सच्या मालकीची लक्झरी वाहन कंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापकीय पदांमध्ये कपात करणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, ही प्रक्रिया स्वेच्छानिवृत्ती योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.
हा निर्णय व्यवस्थापकीय नेतृत्वाची रचना सध्याच्या आणि भविष्यातील व्यवसाय गरजांनुसार तयार करण्यासाठी घेतला जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ही स्वेच्छानिवृत्ती योजना कंपनीकडून नियमितपणे पात्र कर्मचाऱ्यांना दिली जाते. या निर्णयाचा परिणाम फक्त मॅनेजेरियल लेव्हलवरील कर्मचाऱ्यांवरच होणार आहे.
advertisement
घसरणीचा परिणाम
जग्वार लँड रोव्हरने ही कपात अशा काळात केली आहे जेव्हा कंपनी अमेरिकेतील उच्च टॅरिफ दरांमुळे आणि जागतिक मागणीतील घटेमुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जाते आहे. अलीकडेच ब्रिटन-अमेरिका व्यापार करारानुसार, अमेरिकेतील ब्रिटिश गाड्यांवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. मात्र या कराराअंतर्गत दरवर्षी फक्त 1 लाख गाड्यांच्या निर्यातीस परवानगी आहे. ही मर्यादा ओलांडल्यास पुन्हा उच्च टॅरिफ लागू होणार आहे.
advertisement
अप्रैल-जून 2025 या तिमाहीत JLR ची विक्री घसरली. टॅरिफ वाढल्यामुळे या तिमाहीत कंपनीचे अमेरिका शिपमेंट थांबले होते.
पूर्णपणे नव्याने बाजारात उतरण्याची तयारी
JLR आता पूर्णपणे नव्या रूपात बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2026 च्या सुरुवातीस नव्या मॉडेल्ससह रीलॉन्चची योजना आखली आहे. यासाठी बहुतेक जुन्या जग्वार मॉडेल्सचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.
advertisement
याशिवाय JLR ने स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांसाठी ev.energy या चार्जिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे. कंपनी जग्वार I-PACE चे 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स वापरून यूकेमध्ये पायलट टेस्टिंग करत आहे. जेणेकरून नव्या सॉफ्टवेअरचे इंटीग्रेशन चाचणी केली जाऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 10:15 PM IST
मराठी बातम्या/मनी/
टाटांचा मोठा निर्णय, 500 कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता; नोकर कपात करताना घेतली ही काळजी