नोकरी ते उद्योजिका विचारांची दिशा बदलली
करुणा आणि प्रविणा या दोघीही चांगल्या पगारावर कार्यरत होत्या. मात्र, दुसऱ्यासाठी रात्रंदिवस राबूनही कष्टाच्या तुलनेत मोबदला आणि प्रगती मर्यादित आहे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपला वेळ आणि कौशल्य स्वतःच्या व्यवसायासाठी का वापरू नये? या एका विचाराने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.
शरिरासाठी आरोग्यदायी, खरेदी करा पारंपरिक पौष्टिक पदार्थ, किंमत फक्त 120 रुपये
advertisement
यूट्यूबपासून सुरू झाला प्रवास
सुरुवातीला यूट्यूबच्या मदतीने मोमोज बनवण्याचे बारकावे त्यांनी आत्मसात केले. वडिलांच्या पश्चात घराची जबाबदारी आईवर होती, अशा परिस्थितीत या बहिणींनी जिद्दीने पाऊल उचलले. एका फूड स्टॉलच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. सुरुवातीला ग्राहक मिळत नसल्याने अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही. क्लाउड किचनपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका यशस्वी स्ट्रीट स्टॉलपर्यंत पोहोचला आहे.
आर्थिक गणितात मोठी झेप
ज्यावेळी या बहिणी 20 ते 30 हजारांची नोकरी करत होत्या, तिथे आज त्या महिन्याकाठी 1 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. दररोज 50 ते 60 प्लेट्सहून अधिक मोमोजची विक्री करत त्यांनी आपला एक वेगळा ग्राहकवर्ग तयार केला आहे.
कष्ट करण्याची तयारी आणि आईची साथ असेल, तर कोणतंही क्षेत्र छोटं नसतं. स्वतःचा व्यवसाय केल्याचा आनंद आणि त्यातून मिळणारी प्रगती समाधानकारक आहे, असं या दोघी बहिणी अभिमानाने सांगतात.
कुठे मिळेल आस्वाद?
जर तुम्हाला या जिद्दी बहिणींच्या हातचे गरमागरम व्हेज मोमोज चाखायचे असतील, तर नाशिकमधील मनपसंद स्वीट्स, पाटील नगर ग्राउंड, सिडको येथे तुम्ही भेट देऊ शकता. तसेच सोशल मीडियावर B.K. Momos या इन्स्टाग्राम पेजवरही त्यांची अधिक माहिती उपलब्ध आहे.