8 सप्टेंबर रोजी सोने 1,08,037 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. जे 12 सप्टेंबरपर्यंत वाढून 1,09,707 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. म्हणजेच एका आठवड्यात सोने 1,670 रुपयांनी महाग झाले. चांदीच्या किमतीतही चांगली वाढ झाली. 8 सप्टेंबर रोजी 1,24,413 रुपये प्रति किलो असलेल्या चांदीचा दर 12 सप्टेंबरपर्यंत वाढून 1,28,008 रुपये प्रति किलो झाला, म्हणजेच एका आठवड्यात चांदी 3,595 रुपयांनी महाग झाली.
advertisement
देशभरात आयबीजेएचे दर स्वीकारले जातात
कृपया लक्षात घ्या की आयबीजेएने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसपूर्वीच्या आहेत. आयबीजेएने जाहीर केलेले दर देशभरात स्वीकारले जातात परंतु त्याच्या किमतींमध्ये जीएसटी समाविष्ट नाही.
Gold : सोनं 18, 22, 24 कॅरेटमध्येच का असतं, 19, 21 किंवा 25 कॅरेट का नाही?
गेल्या एका आठवड्यात सोन्याचा दर किती बदलला
08 सप्टेंबर 2025 – प्रति 10 ग्रॅम 1,08,037 रुपये
09 सप्टेंबर 2025 – प्रति 10 ग्रॅम 1,09,475 रुपये
10 सप्टेंबर 2025 – प्रति 10 ग्रॅम 1,09,635 रुपये
11 सप्टेंबर 2025 – प्रति 1010 ग्रॅम 1,09,097 रुपये
12 सप्टेंबर 2025 – प्रति 10 ग्रॅम 1,09,707 रुपये
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
08 सप्टेंबर 2025 – प्रति किलो 1,24,413 रुपये
09 सप्टेंबर 2025 – प्रति किलो 1,24,770 रुपये
10 सप्टेंबर 2025 – प्रति किलो 1,24,594 रुपये
11 सप्टेंबर, 2025 –प्रति किलो 1,24,499 रुपये
12 सप्टेंबर 2025 – प्रति किलो 1,28,008 रुपये
तुमचं Income शून्य असो किंवा अडीच लाख, या 5 लोकांना भरावाच लागतो ITR, नाहीतर येते Notice
मोबाइलवर सोन्याचा दर जाणून घ्या
कृपया लक्षात ठेवा की, IBJA सरकारी सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सोन्याची किरकोळ किंमत देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. सोन्याच्या किंमतीची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पाठवली जाते.