मुळात एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या ममता कांबळे यांना नेहमीच काहीतरी स्वतःचं करण्याची खंत वाटत होती. शेवटी त्यांनी नोकरीला रामराम ठोकत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी घरूनच सुगंधी मेणबत्त्या तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात काम सुरू केलं, मात्र दर्जा आणि वेगळेपणावर भर दिल्यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
7K Candle या ब्रँडअंतर्गत आज विविध प्रकारच्या आकर्षक आणि दर्जेदार सुगंधी मेणबत्त्या, रूम फ्रेशनर्स उपलब्ध आहेत. या उत्पादनांची खासियत म्हणजे त्यातील सर्जनशील डिझाईन्स जसे की मोदक, मोतीचूर लाडू, काजू कतली, विविध फुलांचे बुके, चहा-बिस्किटं, कॉफी अशा थीम्समध्ये तयार केलेले मेणबत्त्यांचे सेट आहेत. यामध्ये नैसर्गिक घटक आणि सुगंधी तेलांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे हे उत्पादन पर्यावरणपूरकही ठरते.
घर, ऑफिस तसेच गिफ्टिंगसाठी या उत्पादनांची मागणी वाढत असून सण-उत्सवांच्या काळात तर विक्री दुपटीने वाढते. ममता कांबळे यांचा प्रवास हे कमी गुंतवणुकीतून मोठं यश मिळवण्याचं आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभं राहण्याचं उत्तम उदाहरण आहे.