1 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी काही आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 3 वर्षांच्या मुदत ठेवींचे व्याजदर येथे आहेत. हे आकडे 22 सप्टेंबर रोजीचे आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना लागू नाहीत. आम्ही ₹1 लाख गुंतवणुकीवरील रिटर्नचे कॅलक्युलेशन देखील केले आहे.
Bank Holiday: एक दोन नाही तर ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बंद राहणार बँक
advertisement
इंडसइंड बँक: 6.65% व्याजदर, 1 लाख रुपयांची FD तीन वर्षांनी वाढून ₹1,19,950 होईल.
आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक: 6.6% व्याजदर, 1 लाख रुपयांची FD तीन वर्षांनी वाढून ₹1,19,800 होईल.
कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक: 6.4% व्याजदर, 1 लाख रुपयांची FD तीन वर्षांनी वाढून ₹1,19,200 होईल.
बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया: 6.4% व्याजदर, 1 लाख रुपयांची FD तीन वर्षांनी वाढून ₹1,19,200 होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय): 6.3% व्याजदर, 1 लाख रुपयांची FD तीन वर्षांनी वाढून 1,18,900 होईल.
कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक: 6.25% व्याजदर, 1 लाख रुपयांची एफडी तीन वर्षांनी वाढून 1,18,750 होईल.
1 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा! रेल्वे बुकिंग तिकिटाचे बदलणार नियम, तुमच्यावर थेट परिणाम
बँक बुडाली तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट (DICGC) अंतर्गत, बँक बंद पडल्यास किंवा बुडाल्यास ग्राहकांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट सुरक्षित राहतील. तुमच्याकडे बँकेत पैसे जमा असतील, तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून ते डिपॉझिट इन्शुरन्ससाठी रजिस्टर्ड आहे की नाही ते तपासू शकता...