TRENDING:

मंदीत आली झकास संधी, शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा

Last Updated:

Multibagger Stock: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. कंपनीने प्रति शेअर 1.50 अंतरिम लाभांश जाहीर केला असून, 11 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे BEL चे शेअर्स असतील, त्यांना मोठा फायदा मिळण्याची संधी आहे.

advertisement
मुंबई: सेन्सेक्स आणि निफ्टीमधील घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारातील या अस्थिरतेच्या काळात दिग्गज कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. या काळात देखील असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांचा हात सोडला नाही. अशाच एक शेअर्सने आता डिविडेंड जाहीर केला आहे आणि त्यासाठी रेकॉर्ड डेट देखील सांगितली आहे.
News18
News18
advertisement

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. हा निर्णय 5 मार्च 2025 रोजी झालेल्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे.

BEL Dividend 2025 Record Date

BELने 11 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांकडे या तारखेपर्यंत BEL चे शेअर्स असतील, त्यांनाच हा लाभांश मिळणार आहे. लाभांशाची रक्कम जाहीर केल्यानंतर 30 दिवसांच्या आत शेअरधारकांच्या खात्यात जमा केली जाईल.

advertisement

पैसे पाहिजे होते, लावलं भन्नाट डोकं; प्लॅन फसल्यावर पोलिसांनी दिला ‘फ्री कट’

BELच्या शेअर्समध्ये वाढ आणि गुंतवणुकीची संधी

5 मार्च 2025 रोजी BELच्या शेअर्समध्ये 3.86% वाढ झाली आणि शेअर 274.92 रुपयेच्या किमतीला बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे. मात्र, 6 मार्च रोजी त्यामध्ये किंचित म्हणजेच 0.76% घट झाली आणि शेअर 272.95 रुपयेवर बंद झाला. तरीही हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरतोय.

advertisement

शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले, ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम

BELचा इतिहास आणि मल्टीबॅगर परतावा

BELच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 10 जुलै 2024 रोजी BELचा शेअर 340.50 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. मे 2020 मध्ये हा शेअर फक्त 19 रुपयांच्या खाली होता. म्हणजेच, अवघ्या 4 वर्षांत या शेअरने तब्बल 1600% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

advertisement

जर कुणी 2020 मध्ये 19 रुपये दराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची किंमत आता सुमारे 17 लाख रुपये झाली असती. याशिवाय, या कंपनीने अनेक वेळा लाभांशही जाहीर केले आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष परतावा आणखी जास्त आहे.

गुंतवणुकीचे महायुद्ध सुरू, तुमच्या एका चुकीमुळे होऊ शकतं लाखोंचं नुकसान

advertisement

BELची प्रगती आणि महत्वाची निर्णय- BELने याआधीही गुंतवणूकदारांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत,

-सप्टेंबर 2022: कंपनीने बोनस शेअर्स दिले.

-2016 आणि 2018: BELने शेअर बायबॅक केले.

-शेअर स्प्लिट: 10 रुपयांच्या एका शेअरचे 1 रुपयात विभाजन केले गेले होते. यामुळे लहान गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची उत्तम संधी मिळाली होती.

BEL ही भारत सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. ही कंपनी रडार, मिसाईल प्रणाली, नाइट व्हिजन उपकरणे, आणि सायबर सुरक्षा प्रणाली तयार करते. याशिवाय, स्मार्ट सिटी सोल्यूशन्स, हेल्थकेअर उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVMs) सारखी उत्पादनेही कंपनी तयार करते.

BELचा विकास हा मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तसेच, ही कंपनी भारताच्या संरक्षण उत्पादन निर्यातीतही मोठी भूमिका बजावत आहे.

गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा

BELचा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जात आहे. हा शेअर सरकारी क्षेत्रातील असून, भारताच्या संरक्षण उत्पादन वाढीबरोबर त्याची मागणीही वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यातही हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो.

BEL शेअरमध्ये गुंतवणूक करायची का?

-सरकारचा मजबूत पाठिंबा

-संरक्षण क्षेत्रातील वाढती मागणी

-नियमित लाभांश आणि बोनस शेअर्स

-दीर्घकालीन मल्टीबॅगर परताव्याची क्षमता

मराठी बातम्या/मनी/
मंदीत आली झकास संधी, शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल