TRENDING:

'35 कोटी द्या, नाहीतर संपलात'; मुंबईत उघड झाला देशातील सर्वात धक्कादायक ट्रेडिंग स्कॅम, 4 वर्षे सुरु होता शेअर ट्रेडिंगचा फ्रॉड

Last Updated:

Trading Scam: मुंबईतील 72 वर्षीय वृद्ध गुंतवणूकदाराला चार वर्षे अनधिकृत ट्रेडिंग करून तब्बल 35 कोटींचा आर्थिक फटका देणारा ब्रोकरेज घोटाळा उघड झाला आहे. खोट्या नफा स्टेटमेंट्स, OTP नियंत्रण आणि सर्क्युलर ट्रेड्सच्या जाळ्यात दांपत्याची संपूर्ण गुंतवणूक उध्वस्त झाली.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : मुंबईतील 72 वर्षीय व्यक्तीचा तब्बल 35 कोटींचा तोटा करणारा ट्रेडिंग स्कॅम उघड झाला असून, चार वर्षे सुरू असलेल्या या फसवणुकीमुळे ते हादरून गेले आहेत. भरत हरकचंद शाह, राहणार माटुंगा (वेस्ट), यांनी आरोप केला की ब्रोकरेज फर्म Globe Capital Market Limited ने त्यांच्या पत्नीच्या खात्याचा वापर करत चार वर्षे अनधिकृत ट्रेडिंग केले.

advertisement

काय घडले?

शाह हे त्यांच्या पत्नीसमवेत परळ येथे कर्करोगाच्या रुग्णांसाठी अल्प-भाड्याचे गेस्ट हाऊस चालवतात. 1984 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांना एक शेअर पोर्टफोलिओ वारसा म्हणून मिळाला होता. मात्र शेअर बाजाराबद्दल काहीही ज्ञान नसल्याने त्यांनी कधी सक्रिय ट्रेडिंग केले नव्हते.

advertisement

फसवणुकीची सुरुवात 2020 मध्ये झाली. एका मित्राच्या सल्ल्यानुसार शाह यांनी स्वतःचे आणि पत्नीचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट Globe Capital Markets मध्ये उघडले आणि वारशातील शेअर्स त्या कंपनीकडे ट्रान्सफर केले.

advertisement

सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसत होते. कंपनीचे प्रतिनिधी शाह यांच्याशी नियमित संपर्कात राहून आकर्षक आश्वासने देत होते. त्यांनी शाह यांना सांगितले की कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक आवश्यक नसून, शेअर्सचा कोलॅटरल म्हणून वापर करत सुरक्षितपणे ट्रेडिंग करता येईल.

advertisement

कंपनीच्या प्रतिनिधींनी असेही सांगितले की त्यांना "पर्सनल गाईड्स" दिले जातील. याच नावाखाली कंपनीतील दोन कर्मचारी आकाश बरिया आणि करण सिरोया शाह यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमले गेले. यानंतर त्यांनी शाह यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले.

फसवणूक कशी वाढत गेली?

FIR नुसार परिस्थिती लवकरच गंभीर झाली. सुरुवातीला हे दोन्ही कर्मचारी दररोज फोन करून कोणती ऑर्डर द्यावी हे शाह यांना सांगत. काही दिवसांनी त्यांनी शाह यांच्या घरी येणे सुरू केले आणि स्वतःच्या लॅपटॉपवरून ईमेल्सही पाठवू लागले. शाह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रभावाखाली OTP, SMS आणि ईमेल यांवरील सर्व कृती स्वतः करून दिल्या. कंपनीने त्यांना फक्त आवश्यक तेवढीच माहिती दिली आणि उर्वरित सर्व ट्रेडिंगवर स्वतःच नियंत्रण ठेवले.

या काळात शाह यांच्या खात्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग सुरू झाले होते, परंतु त्यांना याची काहीही कल्पना नव्हती. मार्च 2020 ते जून 2024 या काळात कंपनीने त्यांना दरवर्षी "नफा" दाखवणारी स्टेटमेंट्स पाठवली. त्यामुळे त्यांना काहीही गैर वाटले नाही.

फसवणूक कशी उघडकीस आली?

जुलै 2024 मध्ये अचानक Globe Capital च्या रिस्क मॅनेजमेंट विभागाकडून फोन आला. तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या खात्यात 35 कोटींचे डेबिट आहे. तात्काळ भरावे लागेल, नाहीतर तुमचे शेअर्स विकले जातील. शाह कंपनीकडे पोहोचले तेव्हा त्यांना सांगितले की त्यांच्या खात्यांमध्ये प्रचंड प्रमाणात अनधिकृत ट्रेडिंग झाले आहे. कोट्यवधींचे शेअर्स विकले गेले होते आणि अनेक सर्क्युलर ट्रेड्समुळे खात्यावर प्रचंड तोटा जमा झाला होता.

अतिरिक्त नुकसान टाळण्यासाठी शाह यांनी उरलेले सर्व शेअर्स विकून 35 कोटींची रक्कम भरली आणि उरलेले शेअर्स दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर केले.

कंपनीच्या वेबसाईटवरून त्यांनी मूळ ट्रेडिंग स्टेटमेंट डाउनलोड करून ते ईमेलवर पाठवलेल्या "नफा" स्टेटमेंट्सशी तुलना केली आणि तेव्हा पूर्ण चित्र स्पष्ट झाले. दोन्ही स्टेटमेंट्समध्ये प्रचंड तफावत होती. याशिवाय त्यांना समजले की NSE कडून कंपनीला अनेक नोटिसा आल्या होत्या. कंपनीने या नोटिसांना शाह यांच्या नावाने उत्तर दिले. परंतु शाह यांना यापैकी एकाही नोटिसेबद्दल माहिती दिली गेली नव्हती.

शेवटी शाह म्हणाले, चार वर्षे कंपनीने आम्हाला खोटी माहिती दिली आणि प्रत्यक्षात नुकसान प्रचंड वाढत राहिले.

शाह यांनी याला "संगठित आर्थिक फसवणूक" असे म्हटले आहे. त्यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली. प्रकरण IPC कलम 409 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत नोंदवले असून, तपासाची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing (EOW) कडे सोपवण्यात आली आहे.

मराठी बातम्या/मनी/
'35 कोटी द्या, नाहीतर संपलात'; मुंबईत उघड झाला देशातील सर्वात धक्कादायक ट्रेडिंग स्कॅम, 4 वर्षे सुरु होता शेअर ट्रेडिंगचा फ्रॉड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल