फक्त 500 रुपयांत उघडा खातं
पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट उघडण्यासाठी केवळ 500 रुपयांची आवश्यकता असते. कारण 500 रुपये भरून तुम्ही नवं पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज खातं उघडू शकता आणि त्या खात्याचा किमान बॅलन्स तेवढाच असतो. याचा दुसरा फायदा असा असतो की कितीही खर्च झाला तरीही तेवढे 500 रुपये किमान बॅलन्स राखणं तुलनेने सोपं जातं.
advertisement
या अकाउंटबरोबर चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अशा आधुनिक सुविधा पण मिळतात. तसंच आधार लिंकिंगच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटमधील बाकी रकमेवर 4.0% वार्षिक व्याज दिलं जातं, जे प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांच्या तुलनेत अधिक आहे.
बँकांच्या तुलनेत उत्तम पर्याय
भारतात सरकारी आणि खासगी बँकांत सेव्हिंग्ज अकाउंट उघडताना किमान बॅलन्ससाठी वेगवेगळ्या अटी-शर्ती असतात. सरकारी बँकांत किमान 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंत किमान बॅलन्स ठेवावा लागतो तर, खासगी बँकांमध्ये ही किमान रक्कम 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकते. तसंच व्याज दराचा विचार केला तर, सरकारी बँकांत 2.70% आणि खासगी बँकांत 3.00% ते 3.50% पर्यंत वार्षिक व्याज दर मिळतो, जो पोस्ट ऑफिसच्या दरांपेक्षा कमी आहे.
प्राप्तीकरात मिळते सवलत
पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजाला प्राप्तीकर अधिनियम कलम 80TTA अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत करसवलत मिळते. त्याचबरोबर, पोस्ट बँक खातं सरकारतर्फे चालवलं जातं त्यामुळे ते सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंट कोणतीही प्रौढ भारतीय व्यक्ती उघडू शकते. दोघं मिळून जॉईंट अकाउंट काढू शकतात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं खातं उघडता येतं ते त्याचे आईवडिल किंवा पालक हाताळू शकतात. थोडक्यात काय तर कुणीही प्रौढ भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज खातं उघडू शकतो.