अमेरिकन उद्योजकाने ट्विटरवर लिहिले की, फेब्रुवारी 2025 मध्ये शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कियोसाकी यांनी 2013 साली लिहिलेल्या ‘रिच डॅड्स प्रॉफेसी’ (Rich Dad’s Prophecy) या पुस्तकात याचा अलर्ट दिला आहे.
असे पॉयझन दिले की, डॉक्टरांना काही कळायच्या आधीच प्रियकराचा मृत्यू झाला
कियोसाकी म्हणाले, रिच डॅड्स प्रॉफेसी-2013 मध्ये मी चेतावणी दिली होती की इतिहासातील सर्वात मोठा स्टॉक मार्केट क्रॅश येणार आहे. हा क्रॅश फेब्रुवारी 2025 मध्ये होईल.यातील चांगली गोष्ट बाजारातील या घसरणीमुळे यावेळी सर्व काही स्वस्त मिळते. या काळात गाड्या आणि घरे आता स्वस्तात मिळतील.
advertisement
क्रिप्टो, सोनं आणि चांदीवर पैसे लावा
अमेरिकन उद्योजक पुढे म्हणाले, आणखी एक चांगली बातमी अशी आहे की अब्जावधी रुपये शेअर आणि बाँड मार्केटमधून काढून बिटकॉइनमध्ये गुंतवले जातील. बिटकॉइन झपाट्याने वाढेल. जोपर्यंत संधी आहे, त्याचा फायदा घ्या. फेक गोष्टींपासून दूर राहा आणि क्रिप्टो, सोनं आणि चांदीत गुंतवणूक करा. जरी तुम्ही एक सतोशी (बिटकॉइनची सर्वात लहान युनिट किंवा 0.00000001 बिटकॉइन) विकत घेतली, तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता, तर लाखो लोक सगळं काही गमावतील. लक्षात ठेवा, रिच डॅड्स प्रॉफेसीमधील भविष्यवाणी खरी ठरत आहे.
Budget 2025: बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग होणार? कसा दिलासा मिळेल