सातारा : घरातील जुन्या वस्तू शक्यतो अडगळीत पडतात आणि काही दिवसानंतर त्या भंगारत घातल्या जातात. मात्र, सातारा तालुक्यातील कोंडवे येथील एका शेतकऱ्याने 100 ते 150 वर्षांपूर्वीची जुनी शेतीचे अवजारे जतन करून ठेवले आहेत. शेतीत आधुनिक अवजारांचा वापर जसा वाढत गेला तशी जुनी अवजारे कालबाह्य होत गेली. या अवजारांची जागा आता नवीन आणि आधुनिक अवजारांनी घेतली आहे. त्यामुळे शेती करणे देखील अधिक सोपे झाले आहे मात्र रमेश गुजर यांनी ती कालबाह्य झालेली अवजारे फेकून न देता योग्य प्रकारे जतन केली आहेत.
advertisement
सातारा तालुक्यातील कोंडवे येथील रमेश गुजर यांनी 100 ते 150 वर्षांपूर्वीची अवजारे नागरिकांना आणि युवा पिढीला पाहता यावी यासाठी घरामध्ये स्वतंत्र खोली करून ठेवली आहेत. नागरिक ही अवजारे पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात आणि ही अवजारे पाहून गुजर यांचे कुतूहल देखील करतात. या अवजारांचा मागील काळात कसा वापर केला जायचा? याची नावे काय आहेत? याबद्दलची माहिती रमेश गुजर आणि त्यांची पत्नी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना आणि युवा वर्गाला सांगत असतात.
दुष्काळी माणमध्ये केळीची शेती; इराक, इराणला निर्यात अन् एकरी 15 लाखांचे उत्पन्न
कोण कोणती आहेत अवजारे?
125 वर्षांपूर्वीचा लाकूड कापण्याचे करवत, पेरणीसाठी लागणारी घुंगरांची ओटी, लाकडी पाबर, कुळव, नांगर, वखर, डवरा, तिफन, गोफन, औत, विळा, दातळ, ऊसाला भर घालण्यासाठी वापरले जाणारे सर्व प्रकारचे लोखंडे अवजारे, विहिरीवर पाण्याची मोट लाकडी काटवट, रवी दगडी रोलर रांजण आणि बैलगाडीचा साज अशा प्रकारच्या अनेक जुन्या शेती अवजारांचे जतन रमेश गुजर आणि त्यांच्या कुटुंबियांना केले आहे.
Agriculture: भाजीपाला लागवडीतून महाराष्ट्रातील शेतकरी लखपती! किती लाख कमवले वाचा
शेतीसाठी जुन्या वस्तू आता वापरल्या जात नाहीत. मात्र एकेकाळी त्या वस्तूंशिवाय शेती करता येत नव्हती. हा जुना ठेवा नवीन पिढीला पाहता यावा या वस्तूंचे महत्त्व त्यांना समजावे, या वस्तूंची माहिती त्यांना समजावी यासाठी शेतीची जुनी अवजारे जपून ठेवले असल्यास या गुजर दाम्पत्याने सांगितलं आहे.