दुष्काळी माणमध्ये केळीची शेती; इराक, इराणला निर्यात अन् एकरी 15 लाखांचे उत्पन्न
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
दुष्काळी माण तालुक्यात एका शेतकऱ्याने केळीची शेती केली असून त्याची निर्यात इराक, इराणला होत आहे.
सध्याच्या काळात दुष्काळी भागातील शेतकरीही आधुनिक पद्धतीने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची शेती करत आहेत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">सातारा जिल्ह्यातील</a> माण, खटाव तालुक्यांचा परिसर दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. परंतु, माणमधील आंधळी गावचे शेतकरी अशोक शेंडे यांनी आपल्या शेतात खास प्रयोग केलाय. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणाऱ्या ठिकाणी त्यांनी केळीची शेती केली. आता ही केळी इराकला निर्यात करून त्यांना चांगला नफा होतोय.
advertisement
अशोक शेंडे हे दुष्काळी माण तालुक्यातील आंधळी येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या अडीच एकरात वसईच्या केळीची लागवड केली. केळी लागवड करताना अनेकांनी त्यांना पाण्यामुळे केळीची लागवड करू नये, असा सल्ला दिला. मात्र दुष्काळावर मात करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड करून त्यांनी संगोपन करून दाखवले. त्यामुळे केळीला फळधारणाही चांगली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केळीच्या एका घडाला तब्बल 40 ते 45 किलो पर्यंतचा माल मिळत आहे. त्यामुळे एका एकर मधून 15 लाखापर्यंतचे सरासरी उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर अडीच एकरामधून तब्बल 40 ते 45 लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर युवा पिढीने नोकरी मागे न धावता शेती करावी असा एक कानमंत्र देखील शेंडे यांनी दिला आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी)


