आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष २०२५ च्या अर्थसंकल्पाच्या घोषणांवर असेल. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले गेले होते की गुंतवणूकमधील मंदी तात्पुरती असण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्यात सुधारणा होऊ शकते. या सर्वेक्षणात महागाई कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
advertisement
अर्थसंकल्पाच्या दिवशी प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणि बांधकाम, बँकिंग आणि वित्तीय सेवा, भांडवली वस्तू आणि उत्पादन, ऑटो आणि इलेक्ट्रिक वाहने (EV), अक्षय ऊर्जा आणि वीज, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल इस्टेट आणि सिमेंट, संरक्षण आणि अवकाश, कृषी आणि ग्रामीण फोकस कंपन्याच्या शेअर्सवर सर्वांची नजर असेल.
गेल्यावेळी काय झाले होते?
१ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. तेव्हा लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात अशी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नव्हती. त्याचे परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली होती. सेन्सेक्स १०७ अंकांनी घसरून ७१,६५४ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी-५० निर्देशांक १७ अंकांनी घसरून २१,७०९ वर बंद झाला.
गेल्या १० वर्षांत सादर केलेल्या १४ अर्थसंकल्पांपैकी ८ वेळा शेअर बाजार घसरला आहे आणि ६ वेळा वाढला आहे. आता २०२५ च्या अर्थसंकल्पावर शेअर बाजार कशी प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
