मुंबई: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक उत्तम आठवडा ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ११९३.९४ अंकांनी वाढून १.४७% च्या वाढीसह बंद झाला. यामुळे टॉप-१० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली.
advertisement
या टॉप-१० कंपन्यांच्या एकत्रित मार्केट व्हॅल्यूमध्ये १,६९,५०६.८३ कोटी रुपयांची वाढ झाली. गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स ही बजाज ग्रुपची कंपनी आघाडीवर राहिली. जिने केवळ ५ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून दिली.
सर्वाधिक कमाई
गेला आठवडा रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस आणि एसबीआय सारख्या कंपन्यांसाठी फायदेशीर ठरला. मात्र गुंतवणूकदारांना कमाई करून देण्याच्या बाबतीत बजाज फायनान्स सर्वात पुढे राहिली. कंपनीचे मार्केट कॅप वाढून ६,२४,२३९.६५ कोटी रुपये झाले आणि केवळ पाच दिवसांत गुंतवणूकदारांनी ४०,७८८.३८ कोटी रुपयांची मोठी कमाई केली.
कंपन्यांचा फायदा
बजाज फायनान्स व्यतिरिक्त गेल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स यांचा समावेश आहे: इन्फोसिस चे मार्केट कॅप ३३,७३६.८३ कोटी रुपयांनी वाढून ६,३३,७७३.३० कोटी रुपये झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मार्केट व्हॅल्यूमध्ये ३०,९७०.८३ कोटी रुपयांची वाढ झाली आणि ती ११,३३,९२६.७२ कोटी रुपयांवर पोहोचली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप २७,७४१.५७ कोटी रुपयांनी वाढून १८,८७,५०९.२८ कोटी रुपये झाले.
बँकांचाही मोठा फायदा
या काळात बँकिंग क्षेत्रातील शेअर्सनीही चांगली कामगिरी केली. सेक्सेक्सच्या टॉप-१० कंपन्यांमध्ये असलेल्या एसबीआय (SBI) चे मार्केट कॅप १५,०९२.०६ कोटी रुपयांनी वाढून ७,५९,९५६.७५ कोटी रुपये झाले. आयसीआयसीआय बँकेने १०,६४४.९१ कोटी रुपयांची कमाई केली, आणि तिचे मार्केट कॅप १०,१२,३६२.३३ कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेची मार्केट व्हॅल्यू ५ दिवसांत ६,१४१.६३ कोटी रुपयांनी वाढून १४,८४,५८५.९५ कोटी रुपये झाली. भारती एअरटेलचे मार्केट कॅप १०,८५,७३७.८७ कोटी रुपये झाले आणि गुंतवणूकदारांनी ४,३९०.६२ कोटी रुपये कमावले.
दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना तोटा
एकिकडे आठ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला तर दुसरीकडे टॉप-१० मधील दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे नुकसान केले. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ची मार्केट व्हॅल्यू १२,४२९.३४ कोटी रुपयांनी घटून ६,०६,२६५.०३ कोटी रुपये झाली. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) ला १,४५४.७५ कोटी रुपयांचा तोटा झाला आणि तिचे मार्केट कॅप ५,५३,१५२.६७ कोटी रुपये झाले.
मार्केट व्हॅल्यूमध्ये रिलायन्स सर्वात पुढे
देशातील सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज चा दबदबा कायम आहे. ती पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.