CNBCTV-18 च्या माहितीनुसार, कररचना, भांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी पाहता अनेक सेक्टरमधील शेअर्स आज चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
कॅपिटल मार्केटशी संबंधित शेअर्स
दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) किंवा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) कमी करण्याची मागणी बाजाराकडून सातत्याने होत आहे. जर बजेटमध्ये या दिशेने दिलासा मिळाला, तर ब्रोकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांना फायदा होऊ शकतो. Motilal Oswal, Groww, Angel One, Anand Rathi, Nuvama Wealth Management आणि 360 One WAM या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
advertisement
टेक्सटाइल सेक्टर
अमेरिकेच्या टॅरिफमुळे अडचणीत आलेल्या टेक्सटाइल उद्योगाला बजेटकडून दिलास्याची अपेक्षा आहे. निर्यात प्रोत्साहन किंवा करसवलती जाहीर झाल्यास Gokaldas Exports, Welspun Living, Arvind, Indo Count Industries आणि KPR Mill यांचे शेअर्स हालचाल दाखवू शकतात.
रेल्वे सेक्टर
रेल्वे क्षेत्रातील अनेक शेअर्स सध्या त्यांच्या उच्चांकापेक्षा खाली आहेत. बजेटमध्ये रेल्वे व संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या वंदे भारत ट्रेन, पायाभूत प्रकल्प आणि कंत्राटांमुळे Titagarh Rail, Texmaco Rail, BEML, RVNL, IRCON आणि RITES फायद्यात येऊ शकतात. IRFC साठी वाढीव फायनान्सिंग संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘कवच’ सुरक्षा प्रणालीसंबंधी घोषणा झाल्यास HBL Power, Kernex Microsystems आणि Siemens हे शेअर्सही फोकसमध्ये राहतील.
ऑटो सेक्टर
पगार आयोगातील बदल आणि ग्राहक खर्च वाढण्याच्या अपेक्षेमुळे ऑटो क्षेत्राकडेही लक्ष आहे. Maruti Suzuki, Hyundai Motor India, Tata Motors, Bajaj Auto, Hero MotoCorp आणि TVS Motors यांच्यात हालचाल होऊ शकते. इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधांबाबत घोषणा झाल्यास EV-संबंधित कंपन्यांना थेट फायदा मिळू शकतो.
बँक, NBFC आणि इतर क्षेत्रे
MSME क्रेडिट गॅरंटी स्कीमशी संबंधित घोषणा बँकिंग आणि NBFC सेक्टरसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. SBI, PNB, HDFC Bank, ICICI Bank, Bajaj Finance आणि L&T Finance यांच्यावर बाजाराचे लक्ष राहील.
इन्शुरन्स सेक्टरमध्ये करसवलतीत बदल झाल्यास HDFC Life, SBI Life, LIC यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय डेटा सेंटर, हाउसिंग, रिअल इस्टेट, फार्मा आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रांवरील घोषणा देखील ट्रेडिंगची दिशा ठरवू शकतात.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
