पुणे : गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग हे अवलंबले जातात. यामध्ये सोने खरेदी, म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली जाते. परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना अनेक वेळा मनात धाक धुक असते. म्हणजे कमी कालावधीत सर्वांना जास्त आणि लवकर पैसे हे हवे असतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. परंतु हेच पैसे गुंतवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच पुण्यातील एनआयएसएम सर्टिफाईड डेरीवेटिव्ह एनलिस्ट डॉ. गणेश जाधव यांनी माहिती दिली आहे.
advertisement
शेअर बाजारात पैसे गुंतवताना काय काळजी?
शेअर मार्केट हे प्रत्येकालाच आकर्षित करतं असतं. परंतु, त्याच्या खोलामध्ये जर गेलं नाही तर तोटा हा होत असतो. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणाच्या ही भरवशावर करायची नसते. आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा त्या कंपनीच एनालिसिस माहिती असणं गरजेचं आहे. तसंच प्रॉफिट स्टेटमेंट काय आहे? अनुभव कसा आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, असं डॉ. गणेश जाधव सांगतात.
Online शॉपिंग करताना चांगलं डिस्काउंट हवंय? या ट्रिक्स करा फॉलो, होईल मोठा फायदा
शेअर बाजारात गुंतवणूक करता म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता. गुंतवलेले शेअर जर वाढले तर पैसे वाढतात. परंतु तेच शेअरची किंमत कमी झाली तर तोटा हा होत असतो. ही गुंतवणूक काही दीर्घ कालावधीची असते तर काही कमी कालावधीची असते. जर तुम्हाला बाजाराचे ज्ञान असेल, स्टॉक निवडताना काळजी घेतली असेल आणि होणारा तोटा सहन करण्याची तयारी असेल तर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक ही करू शकता,असं डॉ. गणेश जाधव सांगतात.
IPL चाहत्यांसाठी परफेक्ट राहतील हे रिचार्ज पॅक! फक्त 39 रुपयांत होईल काम, चेक करा लिस्ट
या गोष्टीं ठेवा लक्षात
1) सुरुवातीला गुंतवणूक करताना थोड्या प्रमाणात गुंतवणूक ही केली पाहिजे.
2) शेअर मार्केट बदल पुरेसं ज्ञान असणं ही गरजेचं असतं.
3) बाजारातील चढ उतारा बदल समजून घेतलं पाहिजे.
4) कमी कालावधी साठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे.
5) कोणाच्या ही सांगण्यावरून गुंतवणूक करू नये.
6) ट्रेनिंग घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी यावं.
7) ज्या कंपनीमध्ये शेअर गुंतवताय त्या कंपनी बदल माहिती असणं देखील गरजेचं आहे, असंही डॉ. गणेश जाधव यांनी सांगितलं.