Online शॉपिंग करताना चांगलं डिस्काउंट हवंय? या ट्रिक्स करा फॉलो, होईल मोठा फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Shopping Tricks: ऑनलाइन शॉपिंगला मजेदार बनवायचं आणि सोबतच चांगलं डिस्काउंटही मिळवायचं असेल तर या ट्रिक्स प्रत्येक यूझरला अवश्य माहिती असायला हव्यात.
मुंबई : सध्या ऑनलाइन शॉपिंग खूप प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये वेळ वाचतो आणि डिस्काउंटही मिळतो. तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्ससांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग दरम्यान चांगलं डिस्काउंट मिळवू शकता. यामध्ये तुम्ही मोठी बचत करु शकता.
क्रेडिट कार्डचा वापर
अनेक लोक ऑनलाइन शॉपिंग करता तेव्हा अनेकदा कॅश ऑन डिलिव्हरी किंवा डेबिट कार्डने पेमेंट करता. पण तुम्हाला खरेदी केलेल्या प्रोडक्टवर चांगलं डिस्काउंट हवं असेल तर क्रेडिट कार्डने पेमेंट करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट क्रेडिट कार्ड कंपन्यांसोबत हातमिळवणी करते. याच कारणामुळे प्रोडक्ट्सच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळतं.
advertisement
विकेंडला कधीच करु नका शॉपिंग
अनेक लोकांना वाटतं की, वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग केल्याने त्यांना चांगलं डिस्काउंट मिळतं. मात्र हे उलट आहे. खरंतर वीकेंडवर सर्वाधिक क्राउड वेबसाइटवर अॅक्टिव्ह असतो. अशा वेळी तुम्ही शॉपिंग केली तर हे डिस्काउंट मिळण्याची शक्यता खूप कमी असते आणि डिस्काउंटही खूप कमी राहतं. तुम्हाला प्रोडक्टची खरेदी सर्वात जास्त डिस्काउंटवर करायची असेल तर शॉपिंग ऐवजी वर्किंग डेजवर शॉपिंग करा. कारण या दिवशी कमी लोक ऑनलाइन शॉपिंग करतात.
advertisement
फॅशन इन्फ्लुएंसर्सला सोशल मीडियावर फॉलो करा
फॅशन इन्फ्लुएंसर्स सामान्यतः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्ससोबत भागीदारी करतात आणि त्यांच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करतात. या बदल्यात कंपनीकडून त्यांना कूपन कोड्स दिले जातता. जे ते आपल्या सब्सक्रायबरसोबत शेअर करतात आणि तुम्ही या कूपन कोड्सच्या मदतीने प्रोडक्टच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळवू शकतात. ज्यामध्ये जास्तीत जास्त कपडे असतात. अशा वेळी तुम्ही अशा फॅशन इन्फ्लुएंसर्सला सोशल मीडियावर नेहमीच फॉलो करायला हवं.
advertisement
EMI ऑप्शनवर करा खरेदी
तुम्ही एखादं महागडं प्रोडक्ट खरेदी करत असाल तर प्रयत्न करा की, प्रोडक्ट्स ईएमआय ऑप्शनवर खरेदी करा. खरंतर यामुळे तुम्हाला त्या प्रोडक्टच्या खरेदीवर चांगलं डिस्काउंट मिळतं. तसंच कॅश पेमेंट केल्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2024 8:45 AM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Online शॉपिंग करताना चांगलं डिस्काउंट हवंय? या ट्रिक्स करा फॉलो, होईल मोठा फायदा








