TRENDING:

Currency : डॉलरच्या तुलनेत कोणत्या देशाचं चलन सगळ्यात जास्त कमजोर? कोणत्या क्रमांकावर आहे भारताचा रुपया

Last Updated:

जेव्हा एखादे चलन डॉलरच्या तुलनेत कमजोर होते, तेव्हा वस्तू आयात करणे महाग होते आणि त्या देशात महागाई वाढते.

advertisement
मुंबई : तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचले असेल की डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य (Rupee Value) घसरले किंवा वाढले. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजे त्या देशाचे चलन (Currency) असते. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि देशाची आर्थिक स्थिरता यावर चलनाचे मूल्य अवलंबून असते. जेव्हा एखादे चलन डॉलरच्या तुलनेत कमजोर होते, तेव्हा वस्तू आयात करणे महाग होते आणि त्या देशात महागाई वाढते.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

2025 मध्ये भारतीय चलन या रेसमध्ये मागे राहिलं आणि रुपया प्रथमच प्रति डॉलर 90 च्या खाली घसरला. ही घसरण केवळ एक आकडेवारी नाही, तर ती जागतिक स्तरावर डॉलरची वाढलेली मागणी, देशातून बाहेर जाणारी परदेशी गुंतवणूक (Foreign Investment) आणि काही प्रमाणात देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर असलेले दडपण दर्शवते. मात्र, ही केवळ भारताची कथा नाही. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांचे चलन इतके कमजोर झाले आहे की, 1 डॉलर खरेदी करण्यासाठी हजारो किंवा लाखो युनिट्स खर्च करावे लागतात.

advertisement

चला जाणून घेऊया, जगातील सर्वात कमकुवत चलने कोणती आहेत आणि या यादीत भारतीय रुपयाची स्थिती नेमकी काय आहे.

जीडीपी, राजकीय स्थिरता, महागाई आणि परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) यांसारख्या विविध घटकांमुळे जगातील काही देशांची चलने अत्यंत कमकुवत झाली आहेत.

1. लेबनानी पाउंड (Lebanese Pound - LBP)

लेबनानची लेबनानी पाउंड ही जगातील सर्वात कमकुवत करन्सी आहे. लेबनानला अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारी अस्थिरता, बँकिंग प्रणालीचे पतन आणि परकीय चलन साठा संपणे यामुळे पाउंडची किंमत अक्षरशः कोसळली आहे.

advertisement

इथे 1 USD = 89,819.51 LBP आहे. (म्हणजे, १ डॉलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ८९ हजारांहून अधिक लेबनानी पाउंड मोजावे लागतील.)

2. इराणी रियाल (Iranian Rial - IRR)

इराणचे रियाल हे जगातील दुसरे सर्वात कमकुवत चलन आहे. अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी लादलेले आर्थिक निर्बंध हे रियालच्या घसरणीचे प्रमुख कारण आहे. तेलावरील अवलंबित्व, उच्च महागाई आणि सततचा राजकीय तणाव यामुळे रियालची किंमत खूप खाली गेली आहे. इथे 1 USD = 42,112.11 IRR आहे

advertisement

3. व्हिएतनामी डोंग (Vietnamese Dong - VND)

विनिमय दराच्या दृष्टीने व्हिएतनामचा डोंग जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक आहे. विशेष म्हणजे व्हिएतनामची अर्थव्यवस्था चांगली वाढत आहे. मात्र, निर्यात वाढवण्यासाठी आणि उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक ठेवण्यासाठी व्हिएतनाम सरकार मुद्दामहून डोंगचे मूल्य कमी ठेवते. त्यामुळे विनिमय दराच्या हिशोबात ते कमकुवत दिसते.

इथे 1 USD = 26,370.02 VND आहे

advertisement

भारतीय रुपयाची नेमकी स्थिती काय?

2025 मध्ये भारतीय रुपया 90 प्रति डॉलरच्या पातळीवर गेला असला तरी, जगातील डझनभर चलने रुपयापेक्षा खूप जास्त कमकुवत आहेत.

चांगली गोष्ट ही आहे की, भारतीय रुपया जगातील सर्वात २५ कमकुवत चलनांच्या यादीत (Top 25 Weakest Currencies) येत नाही.

भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच, परकीय कर्ज व्यवस्थापन, महागाई नियंत्रण आणि राजकीय स्थिरता या बाबतीत भारताची स्थिती अनेक विकसनशील देशांपेक्षा खूप चांगली आहे. त्यामुळे रुपया कमजोर होत असला तरी, त्याचे मूल्य जगातील इतर अनेक देशांच्या चलनांपेक्षा अधिक स्थिर आणि मजबूत आहे.

मराठी बातम्या/मनी/
Currency : डॉलरच्या तुलनेत कोणत्या देशाचं चलन सगळ्यात जास्त कमजोर? कोणत्या क्रमांकावर आहे भारताचा रुपया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल