पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर परिसरातील सेक्टर ३५ इथं हाइड पार्क सोसायटीमध्ये पोलिसांनी छापा टाकला. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली होती. पोलिसांनी जेव्हा सोसायटीमध्ये छापा टाकला तेव्हा प्रत्येक घरात जाऊन फ्लॅटची तपासणी केली. यावेळी बऱ्याच बांगलादेशी लोकांना पकडण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली असता काही जणांकडे आधार कार्ड होते, पण पासपोर्ट नव्हते. काही जणांच्या व्हिसाची मुदत संपलेली होती. ज्या लोकांकडे आधार कार्ड सापडले ते नकली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
advertisement
या सोसायटीमधून जवळपास १०० संशयित बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या बांगलादेशी नागरिकांना खारघर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तिथे या १०० बांगलादेशी नागरिकांची चौकशी सुरू आहे. भारतात कसे आला, नाव, वय आणि मुळ पत्ता काय होता, याची माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांना संशय आहे की, हे सगळे बांगलादेशी नागरिक बेकादेशीरपणे भारतात आले आहे.
खबऱ्याकडून एक माहिती मिळाली होती, या सोसायटीमध्ये मोठ्या संख्येनं बांगलादेशी नागरिक राहत आहेत, त्यांच्याकडे कोणताही कागदपत्र नाही. या माहितीच्या आधारे आम्ही छापा टाकला तेव्हा १०० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे, याा सगळ्या बांगलादेशी नागरिकांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
सोसायटीचे सचिव, अध्यक्षांचीही होणार चौकशी
दरम्यान, सोसायटीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं फ्लॅट रेंटने दिल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. फ्लॅट मालक आणि सोसायटीचे सचिव आणि अध्यक्षांनीही पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन न करतो, सोसायटीमध्ये फ्लॅट का देण्यात आला अशी विचारणा पोलिसांनी केली. या प्रकरणी फ्लॅटधारकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी सर्व बाबींचा तपास सुरू असून बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या १०० बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
