स्वप्नांचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, फरहान आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना मिलन सबवे परिसरात एका टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की फरहान गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी अपघाताची कारवाई करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी टेम्पोचालक दीपक धोत्रे (वय 28) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्राथमिक तपासात टेम्पोचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरहानचे वडील शाबुद्दीन शेख (वय 51) यांनी या घटनेबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
