क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने भीषण दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित क्रेन रस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. क्रेन वेगात आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याचदरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहन म्हसकर यांना जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यात म्हसकर गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
या प्रकरणी क्रेन चालक विक्रम देशमुख याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून क्रेनची तांत्रिक स्थिती आणि अपघाताच्या वेळीचा वेग याबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान जड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
