मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले सुंदर मोत्याचे व क्रिस्टलचे दागिने हे दिवाळी गिफ्टिंगसाठी एक आकर्षक पर्याय आहेत. या दागिन्यांची किंमत 300 ते 1000 दरम्यान असून प्रत्येक वस्तू कल्पकतेने व मेहनतीने तयार करण्यात आली आहे. हार, कानातले अशा विविध दागिन्यांचा समावेश यात आहे. याशिवाय मुलांनी तयार केलेल्या कापडी टोट बॅग्स देखील खूपच आकर्षक आहेत. या बॅग्सवर छापलेली डिझाईन्स दिल्यानंतर मुलं त्यावर रंगकाम करतात. अशा प्रत्येक बॅगची किंमत 300 असून सोबतचा मिनी पाऊच 100 मध्ये उपलब्ध आहे.
advertisement
दिवाळी सजावटीसाठी देखील या मुलांनी आकाशकंदील, मोत्यांची तोरणे अशा अनेक वस्तू तयार केल्या आहेत. याशिवाय हीच मुले सुगंधी चहा मसालाही स्वतःच्या हाताने तयार करतात. हा मसाला शुद्ध आणि घरगुती पद्धतीने बनवलेला असून घरासाठी उत्तम पर्याय आहे. संस्थेच्या उषा बाळ सांगतात, “मुलं ही कामं करताना खूप आनंद घेतात. त्यांना त्यातून शिकायला मिळतं.आत्मविश्वास वाढतो आणि समाजात त्यांच्या कामाचं कौतुकही होतं. तुम्ही जर या वस्तू खरेदी केल्या, तर त्यांना खूप प्रेरणा मिळेल.” ही उत्पादने ठाणे आणि जवळपासच्या परिसरात ऑर्डरवर मिळू शकतात. नागरिकांनी 9869122357 या क्रमांकावर संपर्क साधून ही दिवाळी खास बनवावी. तुमच्या खरेदीतून विशेष मुलांना आधार मिळू शकतो आणि त्यांचं आयुष्य उजळू शकतं.