मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवासाठी भाविक मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येनं कोकणात जातात. या काळात गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे आणि एसटीकडून जादा गाड्या सोडल्या जातात. यंदा मध्य रेल्वेनं 202 फेऱ्यांव्यतिरिक्त 20 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचं आरक्षण 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
advertisement
तर, दुसरीकडे एसटीच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण सुरू झालं आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून 2 आणि 3 सप्टेंबरपासून कोकणासाठी जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर, कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळालाय. आता मध्य रेल्वेकडून कोणत्या विशेष गाड्या धावतील, पाहूया.
हेही वाचा : आतुरता बाप्पाच्या आगमनाची! गाड्याचं आरक्षण कधीपासून? कुठून सुटणार जादा गाड्या?
लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 8 फेऱ्या :
01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून 6, 7, 13 आणि 14 सप्टेंबर या दिवशी 8 वाजता सुटेल आणि रत्नागिरीत दुसऱ्या दिवशी 4.50 वाजता पोहोचेल. तर, 01031 विशेष गाडी रत्नागिरीहून 7, 8, 14, 15 सप्टेंबर या दिवशी सकाळी 8.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये त्याच दिवशी 5.15 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड इथं थांबेल.
पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेऱ्या :
01443 विशेष गाडी पनवेलहून 8 आणि 15 सप्टेंबर रोजी 4.40 वाजता सुटेल आणि रत्नागिरीत त्याच दिवशी 11.50 वाजता पोहोचेल. तर, 01444 विशेष गाडी रत्नागिरीहून 7 आणि 14 सप्टेंबर रोजी 5.50 वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी 1.30 वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड इथं थांबा देण्यात आला आहे.
पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 फेऱ्या :
01447 विशेष गाडी पुण्यातून 7 आणि 14 सप्टेंबरला 00.25 वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी 11.50 वाजता पोहोचेल. तर, 01448 विशेष गाडी रत्नागिरीतून 8 आणि 15 सप्टेंबरला 5.50 वाजता सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी 5.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड इथं थांबेल.
पनवेल - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या 2 फेऱ्या :
01441 ही विशेष गाडी 11 सप्टेंबर रोजी 4.40 वाजता पनवेल इथून सुटून रत्नागिरीला 11.50 वाजता पोहोचेल. तर, 01442 विशेष गाडी 10 सप्टेंबर रोजी 5.50 वाजता रत्नागिरीतून सुटेल आणि पनवेलला दुसऱ्या दिवशी 1.30 वाजता पोहोचेल.
पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या 2 फेऱ्या :
01445 विशेष गाडी 10 सप्टेंबर रोजी पुण्यातून 00.25 वाजता सुटेल आणि रत्नागिरीत त्याच दिवशी 11.50 वाजता पोहोचेल.