न्यूज१८ लोकमतच्या वतीने 'समृद्ध महाराष्ट्र' या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. न्यूज१८ लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
'5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र रस्त्यावर पाहण्यास मिळणार आहे का? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, 'सगळे मराठी भाऊ आणि बहिण एकत्र चालणार आहे. ज्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे, ते सगळे एकत्र चालणार आहे' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement
'मला वाटतं एकत्र येणे हे महाराष्ट्राच मनात'
तसंच, 'दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मराठी आणि मुंबईसाठी दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाद कोणताच नाहीये. मला वाटतं एकत्र येणे हे महाराष्ट्राच मनात आहे. आम्ही असं निवडणुकीची वाट पाहून वैगेरे काही नव्हतो. भाजपने मुंबईची वाट लावली आहे. त्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत' असं आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.