संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी
कॅप्टन सुमित कपूर ज्या लीयरजेट (Learjet) विमानातून प्रवास करत होते, त्याच कंपनीच्या 'व्हीएसआर लिगसी' विमानाचे शिव कपूर पायलट आहेत. शिव हे अनेकदा या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या को-पायलट शांभवी यांचे वडील आणि निवृत्त एअरफोर्स अधिकारी विक्रम पाठक यांच्यासोबत को-पायलट म्हणून काम करतात. आपल्या वडिलांच्या निधनानंतर शिव कपूर यांच्यासमोर आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे.
advertisement
मुलीचं वैमानिकाशी लग्न
सुमित कपूर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा शिव, मुलगी सान्या आणि वृद्ध वडील असा परिवार आहे. सान्या यांचे लग्नही एका वैमानिकाशी झाले असून, संपूर्ण कुटुंबच विमान क्षेत्राशी निगडित आहे. वडिलांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा शिव यांना आपल्या करिअरमध्ये मोठा आधार होता. मात्र, आता वडिलांच्या मृत्यूनंतर शिव कपूर यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
20000 तासांच्या प्रदीर्घ अनुभव
कॅप्टन सुमित कपूर हे विमान क्षेत्रातील 'एक्झामिनर' पदापर्यंत पोहोचले होते, जे नागरी विमान वाहतुकीतील सर्वात मोठी पोस्ट मानली जाते. शिव कपूर यांच्यासाठी त्यांचे वडील केवळ एक पालकच नव्हे, तर व्यावसायिक आदर्श होते. सुमित यांनी आपल्या 20000 तासांच्या प्रदीर्घ अनुभवातून मुलाला सुरक्षित उड्डाणाचे धडे दिले होते. मात्र, वडिलांचा हा दुर्दैवी शेवट शिव यांच्यासाठी कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेला आहे.
वडील निवृत्तीच्या अगदी जवळ आले असतानाच....
दरम्यान, दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत जेव्हा सुमित कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वच वैमानिकांनी शिव कपूर यांचे सांत्वन केले. वडील निवृत्तीच्या अगदी जवळ आले असतानाच हा अपघात घडल्याने शिव यांच्यासाठी ही वेळ अत्यंत कठीण ठरत आहे.
