सुनेत्रा पवार राजीनामा देणार
सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आपला राजीनामा राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची आज दुपारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेता म्हणून अधिकृत निवड केली जाणार आहे.
advertisement
पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग
विधीमंडळात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार असून, पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आजच संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
साडेपाच वाजता शपथविधी कार्यक्रम
दरम्यान, राजभवनावर होणारा हा सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळात महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जात असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.
