हा लुक कोणताही अधिकृत फॅशन ट्रेंड नसला, तरी लग्नसराईत किंवा प्री-वेडिंग कार्यक्रमांमध्ये असा लुक तुम्ही नक्कीच वापरू शकता, असं फॅशन जाणकार सांगतात. मेहंदी पार्टी, संगीत नाईट किंवा रिसेप्शनसारख्या कार्यक्रमांसाठी हा ब्लॅक शेरवानी लुक साधा, एलिगंट आणि वेगळा दिसतो.
अक्षय खन्नासारखा ब्लॅक शेरवानी लुक कसा करता येईल?
अनेकांना वाटतं की, चित्रपटातील कलाकारांसारखा लुक करायचा म्हणजे मोठा खर्च येतो. मात्र मुंबईतील लोकल मार्केटमध्ये हा लुक परवडणाऱ्या किंमतीत मिळू शकतो. दादर स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या हिंदमाता मार्केटमध्ये तुम्हाला हा ब्लॅक शेरवानी अगदी सहज मिळू शकेल. मुलांसाठीच्या शेरवानी, कोट- जॅकेट आणि पारंपरिक कपड्यांसाठी खरंतर हे मार्केट संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथे लग्नसराईसाठी विविध डिझाईनचे पर्याय उपलब्ध असून, अक्षय खन्नासारखी ब्लॅक रंगाची शेरवानी खास मागणीनुसार तयार करून दिली जाते.
advertisement
फक्त 4,500 रुपयांत पूर्ण सेट
हिंदमाता मार्केटमधील दुकानांमध्ये चौकशी केली असता, अक्षय खन्नासारखा ब्लॅक शेरवानी लुक पूर्ण सेटसह अवघ्या 4,500 रुपयांमध्ये तयार करून मिळतो, अशी माहिती दुकानदारांनी 'लोकल 18'सोबत बोलताना दिली. या किंमतीत शेरवानीसोबत कोट किंवा जॅकेट स्टाईलचा पर्यायही उपलब्ध असतो. विशेष म्हणजे, ग्राहकाला वेगळी डिझाईन हवी असल्यास, कॉलरची स्टाईल, बटणांची रचना किंवा थोडी वेगळी फिटिंग, हे बदलही याच बजेटमध्ये करून दिले जातात.
लग्नसराईत वेगळा पण एलिगंट पर्याय
ब्लॅक रंगाची शेरवानी ही पारंपरिक रंगांपेक्षा वेगळी असली, तरी संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी ती अधिक रॉयल आणि स्टायलिश दिसते. त्यामुळे लग्नसराईत पारंपरिक लुकपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असेल, तर ‘धुरंदर’ चित्रपटातील अक्षय खन्नाच्या लुकपासून प्रेरणा घेऊन असा लुक तुम्ही नक्कीच करू शकता.चित्रपटामुळे चर्चेत आलेला हा लुक आता मुंबईच्या हिंदमाता मार्केटमध्ये सहज उपलब्ध असून, कमी बजेटमध्येही कलाकारांसारखा लूक करता येतो, हे विशेष.