TRENDING:

मोठी बातमी! मुंबई - ठाण्यातील सर्व शाळा उद्या बंद, मुख्याध्यापक संघटनेचा निर्णय

Last Updated:

मुंबई मुख्याध्यापक संघटनेने पाठिंबा दिली असून उद्या मुंबई ठाण्यातील शाळा बंद आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. मुख्याध्यापक महामंडळाने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश आहे. या आदेशाला 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलनास मुंबई मुख्याध्यापक संघटनेने पाठिंबा दिली असून उद्या मुंबई ठाण्यातील शाळा बंद आहेत.
Mumbai Bhandup Marathi School closed
Mumbai Bhandup Marathi School closed
advertisement

राज्यातील शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. या निर्णयामुळे मुंबई ठाण्यातील शाळा उद्या बंद असणार आहेत

उद्या मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने मुंबई विभाग शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात येणार असून या निवेदनात सरसकट सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होण्याची घातलेली अट रद्द करणे.

advertisement

  •  15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करणे.
  •  1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजनालागू करणे.
  •  शिक्षकांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे.
  •  शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे या सह अन्य मागण्यांचा समावेश असणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
  • advertisement

  • या आंदोलनात संस्थाचालक संघटना तसेच इतर सर्व संघटना सहभागी होणार आहेत

मागण्या पूर्ण होत नसल्याने संपाचा इशारा

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.

advertisement

काय होणार आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव?
सर्व पहा

मुख्याध्यापक महामंडळाने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश आहे. बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार आहे

मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! मुंबई - ठाण्यातील सर्व शाळा उद्या बंद, मुख्याध्यापक संघटनेचा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल