advertisement

कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव? इथं चेक करा

Last Updated:

प्रमुख पिकांच्या आवक-जावक आणि बाजारभावांमध्ये झालेल्या चढ-उतारामुळे बाजारपेठेत चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. 

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market 

अमरावती : आज दिनांक 4 डिसेंबर (गुरुवार) रोजी राज्यातील कृषी मार्केटमधील महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. प्रमुख पिकांच्या आवक-जावक आणि बाजारभावांमध्ये झालेल्या चढ-उतारामुळे बाजारपेठेत चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे.  राज्यातील मका, कांदा, सोयाबीनची आजची आवक आणि बाजार भाव काय मिळाला जाणून घेऊ.
मक्याला किती मिळाला भाव? 
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 28 हजार 113 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार 896 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1330 ते जास्तीत जास्त 1823 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये 401 क्विंटल आवक झालेल्या मक्यास 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची सर्वाधिक आवक कुठे? 
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 30 हजार 507 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 43 हजार 215 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 339 ते 1493 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. नाशिक मार्केटमध्ये 1499 क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्यास 1000 ते 4851 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनला किती मिळाला भाव?  
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची एकूण आवक 42 हजार 377 क्विंटल इतकी झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 8 हजार क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. सोयाबीनला प्रतीनुसार 4050 ते 4485 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 हजार 354 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4030 ते 4758 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव? इथं चेक करा
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement