महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचं खास नियोजन, दादरपर्यंत स्पेशल रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आलं समोर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. प्रवासातील गर्दी कमी व्हावी आणि आदिलाबाद परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. प्रवासातील गर्दी कमी व्हावी आणि आदिलाबाद परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून आवश्यक आरक्षण UTS प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी बांधवांनी या सुविधांचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
विशेष गाड्यांचे तपशील
आदिलाबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आदिलाबाद या दरम्यान दोन विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 07129 (आदिलाबाद–दादर विशेष)
ही विशेष गाडी शुक्रवार, 05 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 07.00 वाजता आदिलाबाद येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03.30 वाजता दादर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07130 (दादर–आदिलाबाद विशेष)
advertisement
ही गाडी रविवार, 07 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 01.05 वाजता दादर येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 18.45 वाजता आदिलाबाद येथे आगमन करेल.
थांबे
या विशेष गाड्या मार्गातील पुढील स्थानकांवर थांबा घेतील: किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पुर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, रोटेगाव, नागरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण.
advertisement
संरचना
या गाड्यांमध्ये 12 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे तसेच 2 सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड ब्रेक व्हॅन जोडलेले असतील. यात प्रवाशांना अनारक्षित प्रवासासाठी पुरेशी क्षमता उपलब्ध होईल.
आरक्षण सुविधा
गाड्या अनारक्षित असल्या तरी आवश्यक असल्यास UTS मोबाइल ॲप किंवा बुकिंग काउंटर यांच्या माध्यमातून सामान्य भाड्याने तिकीट व अनारक्षित आरक्षण करता येईल.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचा विचार करून रेल्वेकडून सर्वतोपरी उपाय करण्यात आले आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध राहावा, यासाठी या विशेष सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचं खास नियोजन, दादरपर्यंत स्पेशल रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आलं समोर


