मक्याला किती मिळाला भाव?
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 28 हजार 113 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार 896 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1330 ते जास्तीत जास्त 1823 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये 401 क्विंटल आवक झालेल्या मक्यास 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचं खास नियोजन, दादरपर्यंत स्पेशल रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आलं समोर
कांद्याची सर्वाधिक आवक कुठे?
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 30 हजार 507 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 43 हजार 215 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 339 ते 1493 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. नाशिक मार्केटमध्ये 1499 क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्यास 1000 ते 4851 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनला किती मिळाला भाव?
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची एकूण आवक 42 हजार 377 क्विंटल इतकी झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 8 हजार क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. सोयाबीनला प्रतीनुसार 4050 ते 4485 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 हजार 354 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4030 ते 4758 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





