बीपीएड सीईटी नोंदणीला सुरुवात
बीपीएड अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार असून ती 4 एप्रिल 2026 रोजी होईल. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी 5 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत मैदानी म्हणजेच फिल्ड चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
कधी पर्यंत करता येणार अर्ज?
advertisement
नोंदणी प्रक्रिया गुरुवार 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून इच्छुक उमेदवारांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
ही परीक्षा राज्यातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता अटी, अर्ज भरण्याची प्रक्रिया, शुल्क, वेळापत्रक तसेच इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
बीपीएड अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती तपासून तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
