अर्ज करण्याची अंतिम तारीख अन् पद काय?
ही भरती GBO स्ट्रीम अंतर्गत होणार असून उमेदवारांची नियुक्ती MMGS-II, MMGS-III आणि SMG-IV या पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण 540 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखही 5 जानेवारी 2026 असणार आहे. या भरतीसाठी 25 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
advertisement
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 64,820 ते 1,20,940 रुपया पर्यंत पगार मिळणार आहे.
जाणून घ्या पात्रता?
क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) साठी उमेदवारांनी पदवीधर असणे आवश्यक असून किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.
क्रेडिट ऑफिसर (SMG-IV) पदासाठी पदवीसह किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत?
उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणी करावी. त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे. संबंधित भरती लिंकवर क्लिक करून अर्ज भरा, फोटो आणि सही अपलोड करा, शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
